शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:45 AM

घनसावंगी, मंठा, बदनापूर व जाफराबाद नगर पंचायतीमधील विषय समिती सभापतींच्या सोमवारी निवडी झाल्या.

जालना : घनसावंगी, मंठा, बदनापूर व जाफराबाद नगर पंचायतीमधील विषय समिती सभापतींच्या सोमवारी निवडी झाल्या. या सर्व ठिकाणच्या निवडी बिनविरोध झाल्या असून, पक्षीय सदस्य संख्येनुसार सभापतींच्या निवडीत सदस्यांना संधी मिळाली आहे. निवडीनंतर सर्वच ठिकाणच्या उमेदवार समर्थक, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.सभापतीपदी पवार यांची वर्णीजालना : घनसावंगी नगरपंचायतच्या विषय समिती सभापतींच्या सोमवारी बिनविरोध निवडी करण्यात आल्या.पिठासन अधिकारी म्हणून अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून विक्रम मांडुरके यांनी काम पाहिले. यावेळी स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी सय्यद सलीमाबी गफुर, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी कविता पवार, पाणीपुरवठा सभापतीपदी गणेश हिवाळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी चंद्रकला चव्हाण तसेच उपसभापतीपदी शाहीन बेगम नादेरखाँ पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मनोज मरकड, नगरसेवक शिवप्रसाद चांगले, सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुशिल तौर उपस्थित होते.बदनापुरात अपक्ष बारगाजे यांची सभापतीपदी वर्णीलोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील नगर पंचायतीच्या विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांना सभापतीपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.उपाध्यक्ष शेख युनूस शेख लालमियॉ यांची नियोजन समितीचे पदसिध्द सभापती, काँग्रेसचे राजेंद्र किशनलाल जैस्वाल यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी, अपक्षा मंगल जगन्नाथ बारगाजे यांची महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी, भाजपाचे संतोष दामोदर पवार यांची स्वच्छता, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापतीपदी, राष्ट्रवादीचे फेरोजखान हस्तेखान पठाण यांची पाणी पुरवठा व जलनि:सारण समिती सभापतीपदी बिनविरोध करण्यात आली़ पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी केशव नेटके, सहायक म्हणून मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी काम पाहिल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत पवार यांनी दिली़ यावेळी नगरपंचायतचे अध्यक्ष प्रदीप साबळे यांच्यासह एकूण १७ नगरसेवकांची उपस्थिती होती़मंठा येथे निवडीचा जल्लोषमंठा : येथील नगर पंचायतीचे अध्यक्ष नितीन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विषय समिती सभापतींच्या निवडी पार पडल्या. यात महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी सीमा सोमाणी यांची वर्णी लागली आहे.मंठा नगर पंचायतीतील सिराज खान कलंदर खान यांची स्वछता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. एजाज नसरीन मुसा कुरेशी यांची नियोजन व विकास समिती सभापतीपदी, अचित नाना बोराडे यांची पाणीपुरवठा आणि जलनि:सारण समिती सभापतीपदी, इलियाज कुरेशी यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी तर सीमा नीरजकुमार सोमाणी यांची महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. यावेळी नगसेवक बाळासाहेब बोराडे, नगसेवक प्रदीप बोरडे, नगरसेवक साजेद शेख, जलील शेख, नगरसेवक मोईन कुरेशी, नगरसेवक अरुण वाघमारे आदींची उपस्थिती होती.राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे वर्चस्वजाफराबाद : येथील नगर पंचायतीच्या विषय समिती सभापतींच्या सोमवारी बिनविरोध निवडी करण्यात आल्या आहेत. यात बांधकाम सभापतीपदी बाळकृष्ण हिवाळे यांची वर्णी लागली आहे.नगर पंचायतच्या पाच विषय समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. चार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर एका विषय समितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. जाफराबाद नगर पंचायत विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडली. पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी तर सहायक म्हणून मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी काम पाहिले. सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगर पंचायत मधील गटनेता आणि नगराध्यक्ष यांचे पती यांच्यासह काही सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याने या ठिकाणी भाजपचे वर्चस्व दिसून आले होते. मात्र या निवडीने नवीन पेच निर्माण होणार आहे.जाफराबाद नगर पंचायतची एक वर्षाने निवडणूक होणार आहे. त्यामुळे वर्षभर नगराध्यक्ष व सभापती कसा कारभार चालवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.यांची लागली वर्णीनियोजन व विकास सभापती फारुख कुरेशी, पाणीपुरवठा सभापती अहेमद शेख, स्वच्छता व आरोग्य सभापती वसीम जहागीरदार, बांधकाम सभापती बाळकृष्ण हिवाळे, महिला व बालकल्याण सभापती माजी नगराध्यक्षा नसरीन बेगम शेख सऊद यांची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकpanchayat samitiपंचायत समिती