शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे यांना लावले सलाईन, समाज बांधवांनी केलेल्या विनंतीनंतर उपचार स्वीकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 08:49 IST

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी सलाईन लावावे किंवा पाणी प्यावे यासाठी अंतरवाली सराटी येथील महिलांनी सोमवारी रात्री जवळपास दोन तास त्यांची विनवणी केली होती.

- पवन पवार जालना - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी सलाईन लावावे किंवा पाणी प्यावे यासाठी अंतरवाली सराटी येथील महिलांनी सोमवारी रात्री जवळपास दोन तास त्यांची विनवणी केली होती. महिला व समाज बांधवांनी केलेल्या विनंतीनुसार मनोज जरांगे यांनी मंगळवारी पहाटे १२:२० वाजण्याच्या सुमारास सलाईन लावून घेतले आहे.

तत्पूर्वी मनोज जरांगे म्हणाले, "आमचे कुणीही समितीमध्ये जाणार नाही. ना मी, ना आमच्यावतीने कुणी तज्ज्ञ अथवा महाराष्ट्रातील कुणी, आमच्या वतीने कुणीही जाणार नाही. सरकारनेच त्यांचे कुणी समितीत टाकायचे ते टाकावेत. आमच्या वतीने समितीत कुणीही जाणार नाही. तो मोहही आम्हाला नाही. आम्हाला एकच मोह आहे, तो म्हणजे, काहीही करा, पण मराठा समाजाला आणि त्या पोरांना आरक्षण द्या. एवढाच मोह आम्हाला आहे. समितीत जाण्याचा मोह आम्हाला नाही. त्यासंदर्भात आम्ही आमचे मत स्पष्ट केले आहे. त्यांनीच तज्ज्ञ टाकावेत आणि समाजाला न्याय द्यावा."

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "मी कुणालाही भीत नाही, मी केवळ माझ्या समाजाला भीतो. माझे गावकरी जे भावणिक झाले आहेत मी केवळ त्याला दबतोय. माझ्या माता माऊल्या सगळ्याच गेल्या दोन तासांपासून रडत आहेत, संपूर्ण गाव विनंती करत आहे की, किमान सलाईन तरी घ्या, थोडं पाणी तरी घ्या. ते थोडं माझ्या काळजाला लागतंय. ते माय-बाप आहेत म्हणल्यावर त्यांचे ऐकावे की नाही, या दुविधा मनःस्थितीत आहे. माझ्यात निर्णय घेण्याची क्षमताच राहिली नाही. ते रडले नसते, भावणिक झाले नसते, तर मी आणखीही ताठर राहिलो असतो. काय करावे, सुचत नाहीय. पण बघुया, त्यांच्याकडूनही येईलच ना कुणीतरी आम्हाला सांगायला की, कशासाठी वेळ हवा,  का हवा, ते जबाबदारीने काम करणार आहेत का? आम्ही एक पाऊल मागे यायचं म्हणत आहेत, आम्ही दोन पावलं मागे येऊ. पण वेळ का आणि कशासाठी हवा हे आम्हाला कळायलाही हवे आणि तुम्ही खरोखरच करणार आहात का? हा महत्वाचा मुद्दा आहे."

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना