शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोठा कोळी जवळील तलावाचा सांडवा फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:26 IST

भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून जवळच असलेल्या कोठा कोळी शिवारातील पाझर तलावाचा सांडवा अज्ञात लोकांनी फोडला

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून जवळच असलेल्या कोठा कोळी शिवारातील पाझर तलावाचा सांडवा अज्ञात लोकांनी फोडला आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. अनेक वर्षानंतर तलाव भरला असला तरी वाहून जाणारे पाणी पाहता पुन्हा या भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.कोठा कोळी शिवारात १९७२ च्या दुष्काळात पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून पाझर तलाव बांधण्यात आला. या तलावामुळे परिसरातील शंभर ते दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली आली. तर कोठा कोळी गावाचा कायमस्वरुपी पाणी प्रश्न मार्गी लागावा यासाठी तलाव उभारला. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पाझर तलाव तुडूंब भरला होता. तर बऱ्याच वर्षाने तलावात मोठया प्रमाणात पाणी आल्याने शेतीला फायदा होणार होता. मात्र, येथील पाझर तलावाचा सांडवा शिवारातीलच अज्ञातांनी फोडला आहे. त्यामुळे या तलावातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सांडवा मातीच्या भिंती शेजारुनच फोडल्याने तलाव फुटतो की काय ? अशी भीती तलावाखालील कोठा कोळी ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. लाखो लिटर पाणी वाया जात असून, पुन्हा पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या सांडव्याची दुरूस्ती करावी, सांडवा फोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.प्रथमच तलाव भरला१९७२ नंतर प्रथमच हा पाझर तलाव भरला होता. त्यामुळे गावाचा पाणीप्रश्न मिटणार होता. मात्र, अज्ञात लोकांनी या तलावाचा सांडवा फोडल्याने कोठा कोळी गावाला पुन्हा पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.- अंबादास बावस्कर, सरपंच,कोठा कोळी

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पCrime Newsगुन्हेगारीWaterपाणी