शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हायड्रोलिक पंपचा वापर करून टेंभुर्णीत पेट्रोल पंपावर दरोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:30 IST

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेनंतर पोलीस, ग्रामस्थांनी दोघांना पकडले.

ठळक मुद्दे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डिझेल टँकजवळ कोणीतरी संशयित दिसले. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीस व ग्रामस्थ रस्त्यावर ट्रकला आडवे झाले

टेंभुर्णी (जि. जालना) : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे सोमवारी रात्री एका टोळीने डिझेल चोरीच्या उद्देशाने पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा टाकला. पंपावरील कर्मचाऱ्यांना वेळीच जाग आल्याने दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाठलाग करून उद्धव बापुराव शिंदे (रा. बावी ता. वाशी, जि. उस्मानाबाद) आणि नितीन बापुराव पवार ( रा. तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद) या दोघांना पकडले, तर रामा पांड्या पवार, अनिल विश्राम काळे, चंदन भास्कर काळे, रामा सुबराव काळे ( सर्व रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी पोलिसांनी चार ट्रक तसेच अन्य साहित्य मिळून जवळपास एक कोटी २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

येथील जाफराबाद- देऊळगावराजा रस्त्यावर टेंभुर्णी येथील सरस्वती विठोबा शिंदे यांच्या मालकीचा हा पेट्रोलपंप आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान पेट्रोलपंप बंद करून पंपावरील दोघे कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या  रूममध्ये झोपले होते.  रात्री साडेबारानंतर एका कर्मचाऱ्याला जाग आली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डिझेल टँकजवळ कोणीतरी संशयित दिसले. त्याने सहकाऱ्याला उठवून लगेच गावात मालक व त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. माहिती मिळताच पेट्रोल पंप मालकाचा भाचा संजय सावंत घटनास्थळी हजर झाला. दरोडेखोरांनी मारहाण करून त्याला जखमी केले. पाठोपाठ पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी हजर         झाले. 

दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीस व ग्रामस्थ रस्त्यावर ट्रकला आडवे झाले असता, ट्रक त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस त्र्यंबक सातपुते, पेट्रोलपंप व्यवस्थापक सुनील जगधणे व संतोष शिंदे हे तिघे त्वरीत बाजूला झाल्याने बालंबाल बचावले.  पोलीस व ग्रामस्थांनी पाठलाग करून दोघांना पकडले, तर सात ते आठ जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. या दरोडेखोरांनी १३० लिटर डिझेल टँकमधून बाहेर काढले होते. 

हायड्रोलिक पंपचा वापरदरोडेखोरांनी डिझेल चोरण्यासाठी ‘हायड्रोलिक पंप’चा वापर केला. पंपापासून दूर अंतरावर डिझेल भरण्यासाठी कॅन ठेवून जवळपास पाच पाईप डिझेल टाकीत टाकले. नंतर प्रत्येक नळीला लावलेल्या पंपाने डिझेल बाहेर ओढणे सुरू केले. कॅनमध्ये डिझेल भरून ट्रकच्या डिझेल टाकीत टाकण्याचा त्यांचा डाव होता. यासाठीच चार ट्रक त्यांनी सोबत आणले असावे असा अंदाज आहे. 

कारवाई कोणी केली?ही कारवाई टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सपोनि. सुदाम भागवत यांच्यासह पोलीस कर्मचारी त्र्यंबक सातपुते, गजेंद्र भुतेकर, प्रदीप धोंडगे, दिनकर चंदनशिवे, क्षीरसागर आदिंनी प्रयत्न केले.  यावेळी माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, संजय सावंत, पेट्रोल पंपवरील कर्मचारी निलेश मोरे, शेख अल्ताफ, सुनील जगधणे, गणेश जाधव, विशाल शिंदे, संतोष शिंदे, नितीन शिंदे, रामू पन्हाळकर, एकनाथ अनपट, कृष्णा भोरे, सूर्यप्रकाश मघाडे, स्वप्नील जाधव आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.   

२५ दिवसांपूर्वी अडीच हजार लिटर डिझेलची झाली होती चोरीयाच पेट्रोलपंपवर २३ जून रोजी डिझेलची धाडसी चोरी झाली होती. त्यात चोरट्यांनी अडीच हजार लिटर डिझेल चोरून नेले होते. त्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्या चोरीतही याच चोरट्यांचा हात असल्याचा संशय आहे.

टॅग्स :RobberyचोरीPetrol Pumpपेट्रोल पंपJalanaजालनाPoliceपोलिसArrestअटक