शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव धरणातून अवैध पाणीउपसा; विद्युतपंप जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 01:04 IST

घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील धरणामधील अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या शेतकºयांचे विद्युत पंप महसूल पथकाने बुधवारी जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कराणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील धरणामधील अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या शेतक-यांचे विद्युत पंप महसूल पथकाने बुधवारी जप्त केले.तळेगाव येथील धरणामध्ये अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणामध्ये यावर्षीच्या अल्प पावसामुळे पाणीसाठा वाढलेला नाही यामुळे धरणाची पाणीपातळी जेमतेमच राहिला. या धरणामधून मागील काही दिवसापासून अवैधपणे पाणी उपसा सुरु असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली होती. धरणाच्या कमी होत चाललेल्या पाणीपातळीमुळे परिसरा मध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. जनावराच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला असल्याने शेतक-यामधून चिंता व्यक्त होत आहे. राणी उंचेगावचे महसूल मंडळ अधिकारी एस.बी.कारमपुरी, तलाठी एस.एस.कुलकर्णी, जी. आर. मिसाळ या महसूलच्या या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. महसूल पथकाच्या कारवाईमुळे अवैध पाणी उपशाला लगाम लागणार आहे. महसूलच्या पथकाच्या या कारवाईमुळे पाणी चोरी करणा-यात धास्ती पसरली आहे. पथकासोबत राणीउंचेगावचे सरपंच विठ्ठलराव खैरे, बालासाहेब शिंदे, तुकाराम राठोड, जगन्नाथ जाधव, सतीश माळोदे, लहू झांबरे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागWaterपाणीDamधरण