शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी पाश सैल; तीन शेतकऱ्यांची जमीन परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:38 IST

सावकारकीतून केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द ठरवून संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश जालना येथील सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सावकारकीतून केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द ठरवून संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश जालना येथील सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले. या प्रकरणात तीन शेतक-यांना ७ एकर ३९ आर जमीन परत मिळाली आहे.भाऊसाहेब शेषराव पवार (कर्जत ता. अंबड) यांनी शेतीच्या कामासाठी सावकारी व्यवहारातून ५० हजार रूपये घेतले होते. या व्यवहारात संबंधित शेतक-याने ५ एकर ३ गुंठे जमीन बाबूराव म्हसू नरोटे व कुटुंबाला खरेदीखत करून दिले होते. मात्र, व्याजासह पैसे परत देऊनही जमीन परत मिळत नव्हती. पंढरीनाथ रायभान सरोदे (रा. सरफगव्हाण ता. घनसावंगी) यांनी शेषराव बोरगे याच्याकडून सावकारी व्यवहारातून घेतल्या पैशापोटी एक एकर जमीन खरेदीखत करून दिली होती. पैशाची परतफेड करूनही जमीन परत मिळत नव्हती. या प्रकरणात पंढरीनाथ सरोदे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सीताबाई सरोदे यांनी डीडीआर यांच्याकडे दावा दाखल केला होता. तर उत्तमराव खराबे (रा. हेलस ता. मंठा) यांनी गावातील पुंजाराम आश्रोबा खराबे याच्याकडून सावकारी व्यवहारातून घेतलेल्या पैशापोटी ७६ आर जमीन लिहून दिली होती. पैशांची परतफेड करूनही जमीन मिळत नव्हती. उत्तमराव खराबे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा महादेव खराबे यांनी २०१८ मध्ये सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जालना यांच्याकडे दावा दाखल केला होता.या तिन्ही प्रकरणात शेतक-यांच्या बाजूने अ‍ॅड. दशरथ शिराळे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अ‍ॅड. शिराळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सावकाराचे जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी सोमवारी, या तिन्ही शेतक-यांच्या शेतीचे सावकारीतून झालेले खरेदीखत रद्द करून जमिनी शेतक-यांना परत केल्या.

टॅग्स :RegistrarकुलसचिवFarmerशेतकरी