शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 14:23 IST

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज दूसरा दिवस आहे

अंतरवाली सराटी: मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचा आजचा दूसरा दिवस आहे. आज देखील ते केवळ दोन घोट पाणी पिऊन आहेत. दरम्यान, त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकास जरांगे यांनी परत पाठवले.मराठा आरक्षण हाच उपचार आहे, सरकारकडून आरक्षणाशिवाय काहीच घेणार नाही,असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

राज्य सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक गावांमध्ये साखळी उपोषण सुरू झाले आहे. तसेच राजकारण्यांना गावबंदी देखील करण्यात आल्याने आंदोलनाची तीव्रता व्यापक प्रमाणात दिसून येतेय.दरम्यान, मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणादरम्यान पाणी देखील पिणार नाही हे जाहीर केले. बुधवारी छत्रपती संभाजीराजे यांच्या विनंतीवरून त्यांनी पाण्याचे दोन घोट प्राशन केले. आज देखील त्यांनी केवळ दोन घोट पाणी पिले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये बदल दिसून येत असल्याने आज दुपारी शासनाचे वैद्यकीय पथक तपासणीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले. मात्र, जरांगे यांनी तपासणीस नकार देत पथकाला परत पाठवले. आता सरकारकडून फक्त आरक्षण घेणार, उपचाराची गरज नाही, असे त्यांनी जाहीर केले.

प्रधानमंत्री मोदीवरील प्रश्न टाळले मला काहीही झालेले नाही. सरकारकडून आता फक्त आरक्षण घेयचे, इतर काही नको.माझ्यासाठी आरक्षण हाच उपचार आहे,असे जरांगे यांनी उपचारास नकार देताना स्पष्ट केले. दरम्यान, काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेले होते, आज प्रधानमंत्री मोदी महाराष्ट्रात आले आहेत यावर प्रतिक्रिया विचारली असता आता फक्त उपचारावर बोलू असे जरांगे म्हणाले.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाState Governmentराज्य सरकार