शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सुतार मंचच्या माध्यमातून पुनर्विवाहाची कोंडी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:31 IST

दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले. या विवाहमंचच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रयत्नाने जवळपास ३९ विवाह जुळविले आहेत. मुळात त्यांचीच आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही समाजाचे आपण काही देणे लागतो, यातूनच ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.पुनर्विवाहात कुठल्या अडचणी आहेत ?एकीकडे आपण साक्षर होऊन शिक्षण आणि उच्च शिक्षण घेतले. परंतु ज्यांनी हे शिक्षण घेतले. त्यांच्याच कुटुंबामध्ये क्षुल्लक कारणावरून टोकाचे वाद होऊन विवाह संस्थाच धोक्यात आली आहे. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी अशिक्षित पती-पत्नीमध्ये समेट घडविण्यासाठी जेवढा वेळ लागत नाही. तेवढा वेळ शिक्षित असलेल्या जोडप्यांसाठी खर्च करावा लागतो. विधवा मुलींचा तर प्रश्नच वेगळा आहे. नियतीने त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. हे समजून घेण्यास समाज आजही तयार नसल्याने मोठी खंत आहे.किती विवाह जुळविले ?सुतार समाज मंचच्या माध्यमातून विधवा तसेच घटस्फोटित मुला-मुलींचे ३९ विवाह गेल्या तीन वर्षात जुळविले आहेत. तर अनेकांचे संसार तुटण्यापासून मंचने पुढाकार घेतला. यात समाजबांधवांचाही सिंहाचा वाटा आहे.हलाखीतून भरारीमूळचे जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील असलेले भालेकर यांनी शालेय शिक्षण पोटाला भाकरी मिळत नसल्यामुळे अर्धवट सोडले. हॉटेलमध्ये काम करून उपजीविका भागविली. परंतु जिद्द सोडली नाही. याकामी मला समाज बांधवांसह इतर समाजांतूनही हिंमत मिळत गेली आणि त्यातूनच आज मी हे सामाजिक कार्य करतो.

टॅग्स :Socialसामाजिकcommunityसमाजmarriageलग्न