शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जालना जिल्हा रुग्णालयात नातेवाईकच ओढतात ‘स्ट्रेचर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:24 IST

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांचे हाल

ठळक मुद्देजखमीच्या एका नातेवाईकानेच स्ट्रेचर बाहेर आणले.स्ट्रेचरवरून रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल केले.

जालना : वेदनेने विव्हळणारे अनेक रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, रूग्णवाहिकेतून येणाऱ्या रूग्णांना स्ट्रेचरद्वारे डॉक्टरांकडे नेण्याची जबाबदारी काही वेळा कर्मचारी पार पाडत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागते. असे चित्र बुधवारी दुपारी जिल्हा रूग्णालयात दिसून आले. 

अपघात, मारहाणीतील जखमींसह विविध आजारांनी ग्रासलेले शेकडो रूग्ण जिल्हा रूग्णालयात दैनंदिन उपचारासाठी येतात. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना अतिदक्षता विभागात नेण्यात येते. मात्र, रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर १०८ रूग्णवाहिकेतून रूग्ण आला तरी कर्मचारी स्ट्रेचर घेऊन जात नसल्याचे चित्र आहे. बुधवारी दुपारी १.४१ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकार जिल्हा रूग्णालयात दिसून आला. एका जखमी रूग्णाला रूग्णवाहिकेतून (क्र.एम.एच.१४- सी.एल.११३५) उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. १०८ रूग्णवाहिका आल्यानंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर घेऊन रूग्णाला अतिदक्षता विभागात नेण्यासाठी पुढं येणे अपेक्षित होते. मात्र, कोणी कर्मचारी संबंधित रूग्णाला घ्यायला पुढे आला नाही. त्यानंतर जखमीच्या एका नातेवाईकानेच स्ट्रेचर बाहेर आणले. रूग्णवाहिकेतून बाहेर पडण्यासाठी रूग्णाला साधारणत: सात ते आठ मिनिटे लागली. तोपर्यंत स्ट्रेचर उन्हाने तापून गरम झाले होते. रूग्णाने स्ट्रेचवर हात ठेवला आणि ते पोळू लागले. त्यामुहे तो स्ट्रेचवर एका बाजूला बसून राहिला. स्ट्रेचवर बेडशिट नसल्याने व ते पोळू लागल्याने रूग्णाने त्यावर झोपण्यास नकार दिला. तेथे उपस्थित एका वयोवृध्द महिलेने हातातील ओढणी स्ट्रेचवर टाकल्यानंतर तो रूग्ण स्ट्रेचरवर झोपला. शेवटी नातेवाईकांनीच ते स्ट्रेचर अतिदक्षता विभागात दाखल केले. जालना येथील जिल्हा रूग्णालयात आलेल्या रूग्णाला स्ट्रेचरवर घेऊन जाताना नातेवाईक़ समवेत हातात सलाईनची बाटली घेऊन उभारलेली महिला.

रूग्णवाहिकेतून येणाऱ्या रूग्णाला अतिदक्षता विभागात नेण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय १०८ चे कर्मचारीही मदत करतात. काही वेळा नातेवाईक स्वत:हून स्ट्रेचर घेऊन रूग्णाला डॉक्टरांकडे नेतात. रूग्णांची, नातेवाईकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची दक्षता आम्ही घेत आहोत.  - डॉ. एम.के.राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Jalna civil hospitalजिल्हा रुग्णालय जालनाdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय