शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

अडथळ्यांवर मात करीत रावसाहेब दानवेंचा विक्रमी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 5:58 PM

काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी कैलास गोरंट्याल यांची जालन्यात एकाकी झुंज 

ठळक मुद्देरावसाहेब दानवे विजयी रथावर सलग पाचव्यांदा स्वारधडाडीचा एकही नेता शिल्लक नसल्याने काँग्रेस गर्भगळीत

- संजय देशमुख

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा विजय तेव्हाच निश्चित मानला गेला, ज्यावेळी काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी यावरून खल सुरू होता. कोणीच नेता दानवेंच्या विरोधात दोन हात करण्यास तयार नव्हता. ऐनवेळी २०१४ मध्ये पराभव पत्काराव्या लागणाऱ्या विलास औताडेंच्या गळ्यात उमेदवारी मारण्यात आली. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून दानवेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यात अपयशी ठरले. दानवेंचा विजय एवढ्या मोठ्या मताधिक्याने झाल्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. वाटेतील सर्व अडथळे खुबीने दूर करून दानवे विजयी रथावर सलग पाचव्यांदा स्वार झाले. 

जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला स्व. खा. बाळासाहेब पवार यांच्यानंतर खमक्या नेताच मिळाला नाही. एकवेळेस स्व. अंकुशराव टोपे यांनी विजय मिळवून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न केले. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि टोपे पिता-पुत्र राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसची जिल्ह्यात शकले उडाली. धडाडीचा एकही नेता त्यांच्याकडे शिल्लक नसल्याने आज काँग्रेस गर्भगळीत झाली आहे. माजी आ. कैलास गोरंट्याल हे अल्पसंख्याक समाजाचे असतानाही ते त्यांच्या बळावर जालन्यात काँग्रेसला जिवंत ठेवत आहेत. एकूणच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे प्रस्थ वाढल्याने आणि त्यांनी गेल्या पाच वर्षांत विकास कामे आणि संघटनात्मकबांधणी केली. त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळाले. दानवेंच्या पराभवासाठी केंद्र आणि राज्यातील शेतकरी विरोधी धोरण तसेच दानवेंचे शेतकरी विरोधी वक्तव्य हे त्यांना मारक ठरतील, असे वाटले होते. परंतु नागरिकांना पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा मोदीच हवे होते, त्याचा परिणामही दानवेंचे मताधिक्य वाढण्यावर झाला. लोकसभेत युतीला मिळालेल्या यशामुळे आता पाच महिन्यांनी येणाऱ्या विधासभेतही हेच चित्र राहते की, त्यात बदल होतो, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.

खोतकरांचे बंड  थोपविण्यात यशमध्यतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे मनसुभे बांधले होते. परंतु दानवे यांनी खोतकरांचे बंड थोपविण्याचे काम थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोपवले होते. ती त्यांनी यशस्वी केली.

स्कोअर बोर्डखा. रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९८ हजार ४९ अशी घसघशीत मते मिळवीत सलग पाचवा विजय नोंदविला. त्यांनी गेल्यावेळच्या निवडणक ीत दोन लाख ६ हजारांचे मताधिक्य घेतले होते. यंदा ते वाढून ३ लाख ३२ हजार ८१५ इतके झाले. काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना ३ लाख ६५ हजार १२४ मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे ७७ हजार १५८ मते मिळवीत तिसऱ्या स्थानावर राहिले. 

टॅग्स :jalna-pcजालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल