शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

घरकुल फाईलींवरून दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:10 IST

नगरपंचायत कार्यालयामध्ये सोमवारी दुपारी घरकुलाच्या फाईलीवरून दोन गटात हाणामारी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील नगरपंचायत कार्यालयामध्ये सोमवारी दुपारी घरकुलाच्या फाईलीवरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बदनापूर येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक फिरोजखान हस्तेखान पठाण व वार्ड क्र ५ च्या नगरसेविका यांचा मुलगा शेख समीर शेख चाँद या दोघांमध्ये घरकुलाच्या फाईली व योजना यावरून सोमवारी दुपारी नगर पंचायतीत वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणात नगरसेवक फिरोजखान हस्तेखान पठाण यांनी तक्रार दिली आहे. पठाण हे पालिका कार्यालयात घरकुलाच्या फाईली दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेख याने त्यांच्या फाईल खोट्या असून, त्यात काही दम नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच फायटर काढून डोक्याच्या पाठीमागे मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून शेख समीर शेख चाँद व अरबाज शेख सलीम (दोघे रा. बदनापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ तसेच शेख समीर शेख चाँद यांनीही तक्रार दिली आहे. शेख यांची आई नगरसेविका असून, ते गावातील लोकांचे घरकुलाचे पैसे भरण्याच्या कारणावरून नगर पालिकेच्या कार्यालयात गेले होते. तेथे आरोपींनी त्यांचे घरकुलाचे काम खोटे असून, ती स्कीम खोटी आहे, असे लोकांना पाहून त्याचे कडील पैसे भरू नका, म्हणून शिवीगाळ केली व खुर्चीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून फिरोजखान हस्तेखान पठाण व रहेमदखान हस्तेखान पठाण (दोघे रा. बदनापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस