शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

मत विभाजन झालेच नाही; टोपेंचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला, उढाणांनी घेतला २०१९ चा बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 18:33 IST

राजेश टोपेंच्या बालेकिल्ल्यात हिकमत उढाण यांनी मारली मुसंडी, अटीतटीचा लढतीत २,३०९ मतांनी विजय

तीर्थपुरी : घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांना मतविभागणी झाल्याचा फायदा होईल, असा ओव्हर कॉन्फिडन्स अखेर पराभवाकडे घेऊन गेला. या मतदारसंघात टोपे यांचे प्रतिस्पर्धी असलेले महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण यांनी २०१९ च्या निवडणुकीतील अटीतटीचा बदला घेत २,३०९ मतांनी विजय मिळवला आहे.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार आखाड्यात होते. यात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण व महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार माजी मंत्री राजेश टोपे, भाजपाचे बंडखोर उमेदवार सतीश घाडगे, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शिवाजी चौथे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कावेरी खटके हे प्रमुख उमेदवार होते. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हिकमत उढाण व अपक्ष उमेदवार सतीश घाडगे यांच्यातच खरी लढत झाली. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या कावेरी खटके यांनी मते घेतली. यंदाची निवडणूक टोपे यांनी सहज घेतल्याने मतदारांनी हात दाखवल्याची चर्चा 

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री राजेश टोपे यांनी पाचवेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांनी आरोग्य मंत्री पदही सांभाळले होते. परंतु, यावेळी त्यांनी ही निवडणूक सहज घेतली होती. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे बोलले जात आहे. अपक्ष उमेदवार सतीश घाडगे, शिवाजी चौथे वंचितच्या उमेदवार कावेरी खटके हे उमेदवार महायुतीच्या मताचे विभाजन करणारे असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी टोपे यांना सांगत होते. त्यामुळे या निवडणुकीत नियोजनबद्ध प्रचार केला नसल्याचे दिसून आले आहे. तसेच राजेश टोपे यांच्याकडून व्यापारी व विविध समाजनिहाय बैठका घेण्यात आल्या नाहीत. त्याचाही निवडणूक निकालावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

या मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. त्यामुळे उढाण यांनी २०१९ च्या निवडणुकीचा बदला घेत राजेश टोपे यांचा पराभव केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. या मतदारसंघात सतीश घाडगे यांनी देखील चांगली मते घेतल्याचे दिसून आले आहे. मतदारसंघातील भोगगाव येथील एका केंद्राची मशीन बंद पडल्यामुळे निवडणूक आयोगाने तो निकाल जाहीर केला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

विजयाची तीन कारणे१ घनसावंगी विधानसभा मतदारसंघात साखर कारखानदारीचा उद्योग, प्रचारात मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.२ संपूर्ण मतदारसंघात नियोजनबद्ध प्रचार करण्यात आला होता. यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा प्रचार यंत्रणेत सहभाग होता.३ महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्याचाही परिणाम झाला आहे.

टोपेंच्या पराभवाची कारणे...टोपे यांनी मंत्रिपदाच्या काळात तालुक्यातील अनेक रस्त्यांकडे दुर्लक्ष केले होते. गावागावांत कार्यकर्त्यांचे गट तयार झाले. प्रचारासाठी नियोजन केले नाही. सतीश घाडगेंमुळे मताची विभागणी होईल हा कॉन्फिडन्स भोवला. मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग दिसला नाही.

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मतेहिकमत बळीराम उढाण शिवसेना (शिंदे गट) ९८४९६दिनकर बाबुराव जायभाये बहुजन समाज पार्टी ८७४राजेशभैया अंकुशराव टोपे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीशरदचंद्र पवार ९६१८७कावेरी बळीराम खटके वंचित बहुजन आघाडी २०७३१बाबासाहेब संतुकराव शेळके समता पार्टी ४८३०रमेश मारोतराव वाघ राष्ट्रीय समाज पक्ष २१७विलास महादेव वाघमारे ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक १०९श्याम कचरू साळवे बहुजन भारत पार्टी ५५४आप्पा आण्णा झाकणे अपक्ष १८३गजानन रामनाथ उगले अपक्ष १४२सतीश गणपतराव उढाण अपक्ष २८८सतीश जगन्नाथराव घाटगे अपक्ष २३६९६शिवाजी कुंडलिकराव चाेथे अपक्ष २३२४दिनकर उघडे अपक्ष १७८५निसार पटेल अपक्ष ६५४ज्ञानेश्वर प्रतापराव पवार अपक्ष ८२८बाबासाहेब पाटील शिंदे अपक्ष १०९०ॲड. भास्कर बन्सी मगरे अपक्ष २५९राजेंद्र बबनराव कुरणकर अपक्ष १०८८रामदास आश्रुबा ताैर अपक्ष १०४२विलास आसाराम कोल्हे अपक्ष १४४श्रीहरी यादवराव जगताप अपक्ष १५१सतीश मधुकर घाडगे अपक्ष १३१

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024ghansawangi-acघनसावंगीmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकRajesh Topeराजेश टोपे