शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

‘बासमती’ची खिचडी शिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:32 AM

एस. डी. एस. ब्रोकींग अँड ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली चालणाऱ्या ८ जुगार लॉटरी सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी धाड टाकत ८ जणांना गुरुवारी ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात एस. डी. एस. ब्रोकींग अँड ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली चालणाऱ्या ८ जुगार लॉटरी सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी धाड टाकत ८ जणांना गुरुवारी ताब्यात घेतले. अनिल सुखदेव जाधव (४२ रा. गांधी चमन), मनोज बालचंद परीवाले (३५, रा. अग्रेसेन नगर), संतोष कचरुलाल परीवाले (संग्रामनगर), इम्रानखान सरवर खान(२५, रा. रेल्वेस्टेशन), भास्कर दामोधर पाईकराव (४८ रा. संग्राम नगर), गजानन कारभारी कावळे (२२, रा. बुटेगाव ता. जालना), देविदास दिनानाथ चव्हाण (२७ रा. काद्राबाद), इब्राहीम शेख मोईनोद्दीन (२७ रा. इंदिरा नगर) अशी आरोपींची नावे आहेत.शहरात बºयाच ठिकाणी एस. डी. एस. ब्रोकींग अँड ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाखाली परवाना नसतांना जुगार अड्ड्े सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. या माहितीवरुन त्यांनी शहरातील काही आॅनलाईन लॉटरी सेंटरवर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळी पथके तयार करुन शहरातील ८ लॉटरी सेंटरवर एकाच वेळी धाडसत्र टाकले. यावेळी ८ लॉटरी सेंटरची तपासणी करुन ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपींच्या ताब्यातून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, वेगवेगळ््या कंपन्याचे संगणक संच, नगदी रक्कम, मोबाईल असा एकूण ४ लाख ५८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, सपोउपनि. कमलाकर अंभोरे, विश्वनाथ भिसे, शेख रज्जाक, संतोष सावंत, शांतीलाल दाभाडे, हरीष राठोड, कैलास कुरेवाड, सुरेश गीते, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, सॅम्युअल कांबळे, रामेश्वर बघाटे, तुकाराम राठोड, समाधान तेलंग्रे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, फुलसिंग गुसिंगे, सचिन चौधरी, सदाशिव राठोड, किशोर जाधव, रवि जाधव, हिरामन फलटनकर, सोमनाथ उबाळे, राहुल काकरवाल, विष्णू कोरडे, किरण मोरे, योगेश जगताप, मदन बहुरे, वैभव खोकले, विलास चेके, अंबादास साबळे, मंदा बनसोडे, ज्योती खरात, पूनम भट, शमशाद पठाण, सारिका गोडबोले, मंदा नाटकर, संजय राऊत यांनी केली.बासमती पॅटर्नजालना येथे सुरू असलेल्या आॅनलाईन लॉटरी सेंटरला बासमती डॉट कॉम असे नाव देण्यात आले होते. या माध्यमातून आॅनलाईन लॉटरी खेळली जायची. परंतु ही आॅनलाईन लॉटरी पूर्णत: बेकायदेशीर असल्याचे दिसून आले. या लॉटरीवर जीएसटी क्रमांक नसल्याने ती बनावटच संबोधली जाते. ११ रुपये गुंतविल्यावर शंभर रुपये आकडे जुळल्यास मिळत होते, अशी माहिती गौर यांनी दिली. बनावट ग्राहक पाठवून तिकिट काढले असता लगेचच एका व्यक्तीला याचे आकडेही जुळल्याचा मॅसेज आल्याचेही त्यांनी सांगितले.हा सर्व आॅनलाईन जुगार मटका चालक,मालक दिनेश कुंडलिक बनकर (रा. राजमहल टॉकीज जवळ) यांच्या सांगण्यावरुन चालत होता. पोलिसांनी दिनेश बनकरला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकJalna Policeजालना पोलीस