शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आणि पोलिसांत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:56 IST

अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणात आ.नारायण कुचे यांनी पोलीस निरीक्षकांशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी अर्वाच्य भाषेचा वापर आमदारांकडून करण्यात आरोप पोलिसांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : तालुक्यातील राहुवाडी येथील दोन युवकांना एका साखर कारखान्याच्या मुकादमाने पैशाच्या देवणा-घेवाणीतून अपरहण केल्याचा प्रकार घडला होता. त्या दोन युवकांपैकी एक युवक गावाकडे परतला. त्यावेळी त्यांच्यावरच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणात आ.नारायण कुचे यांनी पोलीस निरीक्षकांशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी अर्वाच्य भाषेचा वापर आमदारांकडून करण्यात आरोप पोलिसांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.राहुवाडी येथील रहिवासी भीमराव राठोड यांच्या तक्रारी संदर्भात सोमवारी अंबडचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांना आ. नारायण कुचे यांनी मोबाईलवरून संपर्क केला. राठोड यांच्या प्रकरणात गुन्हे कसे दाखल करता अशी विचारणा आ. कुचे यांनी केली. त्यावर नांदेडकर यांनी अशी सूचना आपण दिली नसल्याचे सांगितले. तसेच मोबाईलवरून कॉन्फरन्स कॉलवर अंबड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. अवसरे यांना जोडले. त्यावेळी पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून आपण गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अवसरे यांनी सांगितले. त्यावेळी आ. कुचे आणि नांदेडकर तसेच अवसरे यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाची नोंद अवसरे यांनी थेट अंबड पोलीस ठाण्यात रोनामा रजिस्टरमध्ये घेतली. तसेच जो संवाद झाला त्याची कॅसेटही काढण्यात आल्याचे अवसरे यांनी सांगितले. एकूणच या पोलीस अधिकारी आणि आमदारांमधील झालेल्या संभाषणाची अंबड शहरात दिवसभर चर्चा होती.नारायण कुचे : अपशब्द वापरले नाहीतराहुवाडी येथील प्रकरणात पोलीस कर्मचारी अवसरे हे त्या गावात गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथे या प्रकरणात मी गुन्हा दाखल करण्यास सांगितले, अशी चुकीची माहिती दिली. त्याचा खुलासा करण्यासाठी आपण पोलीस निरीक्षक नांदेडकर तसेच अवसरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून विचारणा केली. त्या संभाषणा दरम्यान आपण कुठलेच अपशब्द पोलीसांबद्द वापरले नाहीत. मी पोलीसांशी काय बोललो याची रेकॉडींग माझ्याकडेही आहे.कायदेशीर बाबी तपासणारया प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्याशी या प्रकरणी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, अद्याप माझ्यापर्यंत हे प्रकरण आलेले नाही. जर असे काही घडले असेल तर कायद्यात ज्या तरतुदी आहेत, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ.- लता फड, अप्पर पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :MLAआमदारPoliceपोलिस