शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

खड्डे बुजविण्यासाठी ५० लाखांची तरतूद: गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:44 IST

मोठमोठे खड्डे पडल्याने ते खड्डे तातडीने बुजविण्यासाठी ५० लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर व परिसरातील अनेक भागातील रस्ते पावसामुळे जवळपास वाहून गेले आहेत. मोठमोठे खड्डे पडल्याने ते खड्डे तातडीने बुजविण्यासाठी ५० लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.बुधवारी त्यांनी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, उपमुख्याधिकारी केशव कानपुडे तसेच अन्य प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मालमत्ता कर वसुलीसाठी जवळपास ३७ कोटी रूपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते वसूल करण्यासाठी कर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. नागरिकांना हव्या त्या सुविधा देण्यासाठी पालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी आता आळस झटकून काम करण्याचे निर्देश संगीता गोरंट्याल यांनी दिले.यावेळी विविध विभागातील निधी प्रथम रस्ते दुरूस्तीसाठी वापरला जाणार आहे. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी गुरूवारपासून प्रारंभ होणार आहे. या बैठकीस पालिकेचे अभियंता सौद यांचीही उपस्थिती होती. बैठकीमध्ये जालना शहरातील पाणीपुरवठा करताना वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा मुद्दाही चर्चिला गेला. यासंदर्भात जुना जालन्यातील शिष्टमंडळानेही नगराध्यक्षांची भेट घेतली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagaradhyakshaनगराध्यक्षJalana Muncipalityजालना नगरपरिषद