शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आधी नागरी सुविधा पुरवा; मगच करवाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:45 IST

जालना पालिकेने वाढविलेल्या मालमत्ता करावरून सध्या बराच गोंधळ सुरू आहे. यात बुधवारी माजी नगरसेवक लतीफोद्दीन कादरी यांनी नगर पालिका अ‍ॅक्टचे पुस्तकच सोबत आणून समितीतील सदस्यांना चांगलेच भंडावून सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेने वाढविलेल्या मालमत्ता करावरून सध्या बराच गोंधळ सुरू आहे. यात बुधवारी माजी नगरसेवक लतीफोद्दीन कादरी यांनी नगर पालिका अ‍ॅक्टचे पुस्तकच सोबत आणून समितीतील सदस्यांना चांगलेच भंडावून सोडले. अनेक मुद्यांवर त्यांनी आधी खुलासा करावा, अशी मागणी केली. यावेळी काही प्रकरणांमध्ये फेरमूल्यांकन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष घरी पाठवून त्यात बदल शक्य असल्यास ते करण्याचे प्रयत्न करू असे समितीतील अधिकाऱ्यांनी अनेकांना सांगितले.जालना पालिकेत मालमत्ता करवाढीची सुनावणी सुरू आहे. अनेकांनी आपल्याला आलेला कर हा मोठ्या प्रमाणावर आकारण्यात आल्याच्या तक्रारींचा पाढा समिती समोर वाचला.काही नागरिकांनी पत्र्याचे घर असतानाही एवढा मोठा कर आम्ही कुठून भरायचा, असा सवालही केला. त्यामुळे शक्य झाल्यास नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनीच यात लक्ष घालून फेरमूल्यांकन केल्यास गरिबांवरील करबोजा कमी होऊ शकतो असे सांगितले.यावेळी माजी नगरसेवक लतीफोद्दीन कादरी यांनी समिती समोर नगर पालिकेच्या कायद्याचे पुस्तकच ठेवलं. त्यातील एक - एक कलम आणि त्या संदर्भातील शासनाचे निकष या बद्दल थेट समितीच्या सदस्यांनाच जाब विचारला. परंतु हे तुमचे योग्य असले तरी ही करवाढ करताना आम्ही कोणाचाच कर हा हेतू पुरस्सर वाढविला नसल्याचे सांगितले. तसेच कोलोब्रो कंपनीकडून जो सर्वे करण्यात आला.त्यातील सर्वे करणारे तांत्रिक कर्मचारी हे पालिकेचे नव्हते, किंवा त्यांना करवाढीसाठी चुकीचे मोजमाप घ्यावे अशा सूचनाही नव्हत्या. परंतु मोजणीत एखाददुसरी त्रुटी असू शकते, परंतु हे सर्वेक्षणच चुकीचे आहे असे म्हणणे गैर ठरेल, असे सांगितले.एकूणच बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी पालिका प्रशासनाने बरीच खबरदारी घेतली. मंगळवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना शिस्तीत वागण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. बुधवारी सुनावणीचा दुसरा दिवस होता.गेल्या दोन दिवसात समिती समोर जवळपास एक हजार २०० नागरिकांनी आपले म्हणणे सादर केल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली.पुन्हा दौरा : नेटके नागपूरला रवानाजिल्हाधिका-यांचे प्रतिनिधी असलेले उपविभागीय अधिकारी केशव नेटके हे पहिल्या दिवशी सुनावली नसल्याने एक दिवस ही सुनावणी पुढे ढकलली होती. परंतु त्यांनी केवळ मंगळवारी समितीत हजेरी लावून ते पुन्हा बुधवारी सुनावणीस गैरहजर राहिले. त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिका-यांचे प्रतिनिधी नसतील न्याय कसा मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु नेटके यांना सरकारी कामानिमित्त नागपूर येथे जावे लागल्याने ते बुधवारी येऊ शकले नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदTaxकर