शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

‘सगेसोयऱ्यांना’ही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी, जरांगे यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 06:21 IST

१७ आणि १८ तारखेला राज्यभरात शिबिरे होणार असून, ग्रामपंचायतींवर नोंदी आढळलेल्यांच्या याद्या लागतील. त्यांना अर्जानंतर प्रमाणपत्र वाटप होईल.

वडीगोद्री (जि. जालना) : मराठा समाजातील कुणबी नोंद आढळणाऱ्या व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद सुधारित अधिसूचनेत करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. अधिसूचनेचा मसुदा घेऊन मंगळवारी आ. बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.  

१७ आणि १८ तारखेला राज्यभरात शिबिरे होणार असून, ग्रामपंचायतींवर नोंदी आढळलेल्यांच्या याद्या लागतील. त्यांना अर्जानंतर प्रमाणपत्र वाटप होईल. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तातील काका, पुतणे, भावकी नातेवाइकांनी पितृसत्ताक पद्धतीने सगेसोयरे आणि नातेवाइक आहेत, असे शपथपत्र पुरावा म्हणून दिल्यास त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून देण्यात येईल. नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत झालेल्या स्वजातीय विवाहातून तयार  नातेसंबंधातील नागरिकांना लाभ दिला जाईल. सदर विवाह स्वजातीत झाल्याचा पुरावा द्यावा लागेल, असे बदल केल्याचे आ. कडू यांनी सांगितले. 

‘दोन दिवसांत ५४ लाख प्रमाणपत्र द्या’  सरकारने नोंदी सापडलेल्या ५४ लाख लोकांना २ दिवसांत कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्यांच्या रक्तनात्यातील नातेवाइकांना प्रमाणपत्र वाटावे.प्रमाणपत्रच वाटप झाले नाही तर अध्यादेशातील बदलांना अर्थच राहणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी यावेळी मांडली. शिवाय, मराठवाड्यासाठी निजामकालीन गॅझेट, मुंबई गव्हर्न्मेंटचे गॅझेट लागू करा, अशी मागणीही केली.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील