शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मीय विश्वशांती सोहळ्याची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:44 IST

तुपेवाडी येथील खडेश्वरी महाराज शिवशक्ती आश्रमात विश्वशांती धर्म सोहळ््यासह सर्व धर्म समभाव संमेलनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती प. पू. पवन भारती खडेश्वरी महाराज यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : तुपेवाडी येथील खडेश्वरी महाराज शिवशक्ती आश्रमात विश्वशांती धर्म सोहळ््यासह सर्व धर्म समभाव संमेलनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती प. पू. पवन भारती खडेश्वरी महाराज यांनी दिली आहे.येथील आश्रमामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सामुदायीक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर, श्रीराम कथा आणि शिवलीलामृत तसेच अखंड हरिनाम सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सोहळ््याला करवीर पीठाचे प. पू. जगतगुरू शंकर आचार्य विद्यार्नसिंग भारती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.याविषयी खडेश्वरी महाराज म्हणाले, महायज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहात धार्मिक कार्यक्रमा बरोबरच विविध सामाजिक उपक्रम येथे राबवले जाणार आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. त्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ््याचे आयोजन करण्यात आले असून सर्वधर्मीय संत महंतांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सलग सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात ग्रामस्वच्छता अभियान, शेती विषयी व्याख्यान, शिवचरित्र, यज्ञ आणि पर्यावरण, सर्वधर्म समभाव, संस्कार आणि संस्कृती आदी विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील शिवशक्ती आश्रमात वर्षभर गो संवर्धन, रक्तदान शिबीर, अन्नक्षेत्र, नित्य चतुर्थी अन्नदान, आरोग्य शिबीर, ज्ञानदान, वृक्षारोपण, साधू- संत, महंतांची सेवा व गरजू मुलांसाठी शैक्षणिक सहकार्य नियमित केले जात असून राष्टÑीय संत, पुरूष व हुतात्मे यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. तसेच यंदा विवाह नोंदणी येथे सुरू करण्यात आली आहे. यामुळे इच्छुकांनी तातडिने नाव नोंदणी करावी, असे आवाहन खडेश्वरी महाराजांनी केले आहे. एकूणच या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमcommunityसमाज