शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

पंचेचाळीस गावांचा वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:13 AM

जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.जिल्ह्यातील विजेचा वापर करणा-या घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महावितरणने विभाग एक व दोन अंतर्गत वाढत्या थकबाकीच्या वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत तीन ते चार वर्षांपासून वीज देयक न भरलेल्या ४५ गावातील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण ४ कोटी २१ लाख ८८ हजार थकबाकी आहे. यामध्ये जालना ग्रामीण उपविभागातील हिरवर्डी, नसडगाव, हस्ते पिंपळगाव, अंबड उपविभागातील भांबेरी, दौडगाव, सौंदलगाव, डोमेगाव, वैणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, डोलारा, करंजळा, कुरण, डोमलगाव, धर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव, तर घनसावंगी उपविभागातील घानेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, उक्कडगाव, विरेगाव, मुधेगाव, रव्हणा, बोरंगाव तांडा, घोंन्सी तांडा, जोगलादेवी, कोठी, श्रीकृष्णनगर तांडा, गणेशनगर तांडा, शेवता या गावांचा समावेश आहे. आपला वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज ग्राहकांनी थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. दरम्यान, ऐन परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांकधून संताप व्यक्त होत आहे.वीज बिल वसुलीच्या नावाखाली महावितरणने घनसावंगी तालुक्यातील १६ व अंबड तालुक्यातील १४ गावांचा विजपुरवठा बंद केला असल्याने बारावीच्या परिक्षेस बसलेल्या विद्यार्थांचे नुकसान होत आहे .या परिक्षेचा कालखंड संपेपर्यंत तातडीने विद्युत पुरवठा चालु करण्याच्या सूचना आ.राजेश टोपे यांनी अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांना दिल्या आहेत. घनसावंगी तालुक्यातील ७१ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे विद्युत जोडणी देखील महावितरणने खंडित केल्याने त्या गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याही ठिकाणचा विद्युत पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. राजेश टोपे यांनी दिला आहे.