नागरिकांची गैरसोय
जालना : नवीन जालना भागातून कसबा भागाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. पालिकेने या मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सूचनांचे उल्लंघन सुरूच
भोकरदन : कोरोनाच्या डेल्टा प्लसमुळे शासनाने निर्बंध कडक केले आहेत. परंतु, भोकरदन शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत असून, अनेकजण मास्कसह इतर सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. याकडे प्रशासकीय पथकांनी लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
वाहतुकीची कोंंडी
परतूर : शहरांतर्गत बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर अनेक चालक आपली वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याचा अधिक त्रास पादचारी नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रशासनाने ही वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.
धोकादायक विद्युत डीपी
जालना : शहरांतर्गत अनेक मुख्य मार्गावर महावितरणच्या डीपी आहेत. त्यातील अनेक डीपी या सताड उघड्या राहत आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. ही बाब पाहता संबंधितांनी शहरातील डीपी कुलूपबंद ठेवाव्यात, अशी मागणी होत आहे.