शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा, केळणा नदीपात्रात उरले बंधाऱ्याचे सांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:38 IST

पूर्णा, केळणा नदीला आलेल्या पुरात तब्बल १२ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, नद्या, नाल्या दुथडी वाहू लागल्या आहेत. पूर्णा, केळणा नदीला आलेल्या पुरात तब्बल १२ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले. या बंधाऱ्यांचे केवळ सांगडे नदीपात्रात उभा आहेत. तर महापुरामुळे नद्यांनी प्रवाह बदलल्याने ५० हून अधिक शेतक-यांची शेतजमीन वाहून गेली आहे.भोकरदन तालुक्यात २७ आॅक्टोबर व १ नोव्हेबर रोजी परतीच्या पावसामुळे पूर्णा, गिरजा, केळणा, जुई, धामणा, रायघोळ या नद्यांना अनेक वर्षानंतर महापूर आला होता. पाण्याच्या प्रवाहात पूर्णा नदीवरील तांडा बजार, तांदुळवाडी, जैनपुर कठोरा, सिरसगाव मंडप, नांजा, बेलोरा, केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-यांच्या दोन्ही बाजुचा भराव वाहून गेला. त्याच प्रमाणे केळना नदीवरील भोकरदन, गोकुुळ, आलापूर, आरतखेडा, वरखेडा विरो, जुई नदीवरील निंबोळा, व रायघोळ नदीवरील शेलूद व पारध येथील बंधाºयांचा भरावही पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणीसाठा होणार नाही. या भागातील नद्यांनी पात्राच बदलल्याने लगतच्या शेतक-यांच्या जमिनी पिकासह वाहून गेल्या आहेत. नदीच्या काठावरील विहिरी गायब झाल्या असून, ५० पेक्षा जास्त शेक-यांना मोठा फटका बसला आहे. केळना नदीवरील आलापूर येथील बंधारा वाहून गेल्यामुळे येथील शेतकरी राहुल चौधरी यांची एका बाजुची शेती वाहून गेली आहे. शिवाय विहीर ढासळली आहे.पाणीसाठा व्हावा म्हणून लघुसिंचन जलसंधारण विभागाच्या वतीने तालुक्यातील कोल्हापुरी बंधा-यांना गेट बसविण्यात आले होते. मात्र, सतत अपुºया प्रमाणात पडणारा पाऊस यंदा धो-धो बरसला आणि पुरात कोल्हापुरी बंधा-याची वाताहत झाली.तालुक्यात सिंचनक्षेत्र वाढीसाठी गत पाच वर्षात मोठ्या प्रमाणात बंधा-याची कामे करण्यात आली होती. त्यापैकी कोल्हापुरी बंधा-याची वाताहात झाली. मात्र सिमेंट बंधारे तग धरून आहेत. केवळ शेलूद व पारध येथील बंधारा वाहून गेला आहे़

टॅग्स :RainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प