शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

खोतकर-गोरंट्यालमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:08 IST

राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे.

\लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर आता परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. अद्याप प्रचाराला प्रत्यक्ष प्रारंभ झाला नसला तरी, एकमेकांवर कुरघोडी करण्याची कुठलीच संधी हे दोन्ही नेते सोडत नसल्याचे वास्तव आहे.जालना विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खोतकर विरूध्द गोरंट्याल असाच सामना रंगणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे खोतकरांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली असून, त्यांनी ग्रामीण भागाची एक प्रचारफेरी पूर्ण केली असून, ते आता शहरात लक्ष ठेवून आहेत. यामुळे गेल्या चार दिवसांमध्ये एकमेकांवर आरोपांची संधी दोघेही सोडत नसल्याचे दिसून येत आहे. जालना पालिकेला निधी देण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. गोरंट्याल यांच्या म्हणण्या प्रमाणे खोतकरांकडून जालना पालिकेला गेल्या पाचवर्षात कोणता निधी दिला याचे स्पष्टीकरण द्यावे असे आवाहन त्यांनी गुडलागल्ली परिसरात एका विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले होते. त्यावरून खोतकरांकडून आम्ही शहर विकासासाठी राखीव पोलीस दलाच्या निवासस्थानासाठी अडीच कोटी रूपये दिले असून, रस्ते विकासासाठी विशेष बाब म्हणून सहा कोटी रूपये दिले आहेत, असे जाहीर केले. परंतु यावर पलटवार करताना गोरंट्याल यांनी रविवारी एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरवा केल्याने त्यांनी शासन म्हणून निधीही दिला. परंतु तसे खोतकरांकडून निधी मिळाल्याचे ज्ञात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खोतकरांनी त्यांच्या भाग्यनगरमधील नाला दुरूस्तीसाठी दोन कोटी रूपयांचा प्रस्ताव जालना पालिकेकडून मंजूर करून घेतला होता. परंतु प्रत्यक्षात हे काम आजही झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने जकात नाके बंद केल्यावर त्याच्या तुलनेत निधी देऊ केला आहे. तोच निधी आपण दिल्याचे खोतकर सांगत असतील तर ती बाब चुकीची असल्याचे गोरंट्याल यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणArjun Khotkarअर्जुन खोतकरcongressकाँग्रेस