जालना : नळाचे पाणी भरतांना विजेचा धक्का लागून चंदनझिरा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रदीप मुरलीधर काजळे (३८) यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.काजळे हे चंदनझिरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ठाण्यातून कर्तव्यावरून घरी आले होते. शासकीय निवासस्थानी नळाचे पाणी भरत असतांना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. काजळे २००३ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. मनमिळावू स्वाभावामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन काजळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
शॉक लागून पोलीसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:24 IST