शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केळीगव्हाण येथून पोलिसांनी केली २ हजार ब्रास वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:13 IST

बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील अवैध वाळू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील अवैध वाळू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई केली. यावेळी ६८ लाख २२ हजार रुपयांची २२७४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अमोल मदन, केशवराव व्यंकट मदन (रा.केळीगव्हाण, ता. बदनापूर) यांच्याविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, केळीगव्हाण गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूसाठा करुन ठेवला असून, त्याची चोरटी विक्री केली जात आहे. या माहितीवरुन सदर ठिकाणी पाहाणी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आढळून आला. सदर वाळूच्या मालकाबाबत विचारणा केला असता, सदर वाळूचासाठा अमोल मदन, केशवराव मदन यांचा असल्याचे समजले. महसूल विभागाचे पथक बोलवून या वाळूसाठ्याचे मोजमाप करुन ५० लाख २२ हजार रुपयांची १६७४ ब्रास वाळू जप्त केली.तसेच केळीगव्हाण शिवारातीलच राजेवाडी साठवण तलावात अवैध वाळूसाठा आढळला. हा वाळूसाठाही अमोल मदन व केशवराव मदन यांचा असल्याचे समजले. या वाळूचा पंचनामा करुन मोजमाप करण्यात आले. येथून १८ लाख रुपयांची ६०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या दोन्ही ठिकाणाहून ६८ लाख २२ हजार रुपयांची २ हजार २७४ रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे.पोउपनि ज्ञानेश्वर सानप यांच्या फिर्यादीवरुन अमोल केशवराव मदन, केशवराव मदन यांच्या विरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि ज्ञानेश्वर सानप, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, गोकुळसिंग कायंदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, किशोर जाधव, संजय राऊत, शमशाद पठाण यांच्यासह महसूलचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीPoliceपोलिस