शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी १५ मार्च रोजी दुपारी नांजा व केदारखेडा शिवारातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी १५ मार्च रोजी दुपारी नांजा व केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या पाच वाहनांवर कारवाई केली. या वेळी एकूण २७ लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी केदारखेडा येथे एक ट्रॅक्टर वाळूसह जप्त करून केदारनाथ जाधव यांचेवर कारवाई केली. दुपारी नांजा येथे वाळू उत्खनन, वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर मिळून आले. जप्त केलेली वाहने ठाण्याच्या आवारात लावली आहेत. अनिल मोरे (नांजा) व इतर फरार आरोपींवर ५ वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. या कारवाईत २७ लक्ष ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी सुनील जायभाये यांचे मार्गदर्शनाखाली पोनि दशरथ चौधरी, सपोनि बी.बी. वडदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.पोलीस, महसूलच्या कारवाईत फरक !पोलिसांनी वाहने पकडल्यानंतर गुन्हा दाखल करून वाळू जप्त केली जाते. तर महसूलने कारवाई केल्यानंतर लाखो रूपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे अनेक वाळू माफिया पोलिसांची कारवाई परवडते अशा आविर्भावात राहत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतरही नियमानुसार मोठा दंड आकारण्याची गरज आहे.रविवारी सुटी असल्याने वाळू तस्करांकडून बिनधास्तपणे वाळूचे उत्खनन, वाहतूक सुरू होते. मात्र, माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे पथक व भोकरदन पोलिसांनी धडक कारवाई केली. कारवाईनंतर वाहने सोडा आणि वाहने सोडू नका म्हणून आलेल्या फोनमुळे मात्र, पोलीस कर्मचारी चांगलेच वैतागले होते.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी