लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पोलीस कल्याण सप्ताहानिमित्त पोलीस कल्याण विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालयासह इतरत्र कार्यरत सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना विरंगुळा आणि तणावमुक्तिसाठी येथील नीलम सिनेमागृहात ‘दि इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ हा देशभक्तीपर चित्रपट दाखविण्यात आला. या उपक्रमास पोलीस कुटुंबियांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, २२५ जणांनी चित्रपटाचा लाभ घेतला आहे.सकाळच्या सत्रात हा चित्रपट दाखविण्यात आल्यामुळे पोलीस कुटुंबांना या चित्रपटाचा मनमुरादपणे आनंद घेता आला. हा चित्रपट दाखविण्याचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह पोलीस कल्याण विभाग आणि विशेष कृती दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोलीस निरीक्षक निकम, पोलीस उपनिरीक्षक अंभोरे, शेख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह लुटला चित्रपटाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:38 IST