ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:21 AM2021-01-13T05:21:35+5:302021-01-13T05:21:35+5:30

जालना : जालना जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. निवडणुका सुरळीत व शांततेत पार पडाव्यात, यासाठी ...

Police administration ready for Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

Next

जालना : जालना जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. निवडणुका सुरळीत व शांततेत पार पडाव्यात, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी १२६ अधिकारी, ११५० पोलीस कर्मचारी, एक हजार होमगार्ड व दोन एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.

जालना जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत संपली आहे. कोरोनामुळे निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्या होत्या. त्यामुळे शासनाने ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात. त्यामुळे निवडणुका शांतेतत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांसह १२६ अधिकारी, ११५० पोलीस कर्मचारी व १००० होमगार्ड व दोन एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Web Title: Police administration ready for Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.