शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात पोलिसांची आठ रोडरोमिओंवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 19:47 IST

पोलिसांच्यावतीने विशेष मोहीम राबवत आठ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली.

जालना : पोलिसांच्यावतीने आज विशेष मोहीम राबवत आठ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील वाढती गुन्हेगारी व शाळा कॉलेजमधील मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारातून रोडरोमिओंचा वाढता सुळसुळाट याचा बिमोड करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोनि. यशवंत जाधव, पोनि. बाळासाहेब पवार, पोनि. राऊत यांनी संयुक्त पणे रोडरोमिओवर धडक कारवाईचा बडगा उगारला. 

शहरातील जेईएस महाविद्यालय, बारवाले महाविद्यालय, मत्स्योदरी महाविद्यालय, सरस्वती भूवन महाविद्यालय यासह आदी परिसरात कारवाई करत ८ रोडरोमिओंना ताब्यात घेतले. याप्रकरणी सदरबाजार, चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोनि. यशवंत जाधव, पोनि. बाळासाहेब पवार, पोनि. राऊत यांच्यासह कर्मचारी केली.

कारवाई सुरूच राहील मागील काही दिवसांपासून रोडरोमिओंचा महाविद्यालयांच्या भागात मोठ्या प्रमाणात सुळसुळाट होता. या अनुषंगानेच ही कारवाई करण्यात आली असून, येणाऱ्या काळातही कारवाई सुरुच राहणार आहेत.- समाधान पवार, अपर पोलीस अधीक्षक

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस