शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा झालेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:42 IST

पिकावर फवारणी करताना विषबाधा झालेल्या एका ३३ वर्षीय युवक शेतक-याचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पिकावर फवारणी करताना विषबाधा झालेल्या एका ३३ वर्षीय युवक शेतक-याचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गत तीन महिन्यात पिकांवर फवारणी करताना न कळत ७४ शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे.जिल्ह्यातील शेतकरी आस्मानी- सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यंदा अपु-या प्रमाणात पाऊस झाला असला तरी पीक वाढीच्या काळात कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने पिके चांगली आली. मात्र, रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांनी महागडी औषधे फवारली. मात्र, ही पिके फवारताना आवश्यक ती दक्षता न घेतली गेल्याने गत तीन महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७४ शेतक-यांना न कळत विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यात आॅगस्ट महिन्यात ७, सप्टेंबर ५७ तर तर आॅक्टोबर महिन्यात २ शेतक-यांना न कळत विषबाधा झाली होती.या बाधित शेतक-यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यवस्थ असलेल्या सहा जणांना सोलापूरला हलविण्यात आले होते. तर इतर शेतक-यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार झाले असून, त्यांना वेळेत डिश्चार्ज देण्यात आला आहे.अंबड तालुक्यातील ताड हदगाव येथील शेतकरी नामदेव महादेवराव खर्जुले (३३) यांनी रविवारी पिकावर औषध फवारणी केली होती. मात्र, रात्रीच्यावेळी त्यांना त्रास झाला. सोमवारी त्यांना अंबड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रथमोपचारानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. मयत शेतकºयाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.दरम्यान, कृषी विभाग जनजागृती करीत असला तरी ग्रामीण भागात प्रभावीपणे ही जनजागृती होत नसल्याचेच चित्र होणा-या विषबाधेवरून दिसून येते. विषबाधेच्या वाढणा-या घटना पाहता शेतक-यांनीही पिकांवर फवारणी करताना कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.ताड हदगाव येथील खर्जुले कुटुंबातील तीन भावंडांमध्ये केवळ अडीच एकर शेती आहे. या कुटुंबातील नामदेव यांचा औषध फवारणीनंतर न कळत झालेल्या विषबाधेने मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.कृषी अधिका-यांनी घेतली भेटताड हादगाव येथील बाधित शेतक-याचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच कृषी विभागाच्या अधिका-यांनी खर्जुले कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगण्यात आले. चर्चेचा अहवाल मात्र, रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र