शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या डोळ््यात मिरची पावडर टाकून १० हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:32 IST

दुचाकीने घराकडे जात असताना तीन चोरट्यांनी दुचाकी अडवून शेतक-याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्या जवळील दहा हजार रुपये लुटून नेल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील दैठणा बु. शिवारात शनिवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुचाकीने घराकडे जात असताना तीन चोरट्यांनी दुचाकी अडवून शेतक-याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्या जवळील दहा हजार रुपये लुटून नेल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील दैठणा बु. शिवारात शनिवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास घडली. शेतकरी विनायक लक्ष्मण पवार (५५) रा. दैठणा यांच्या फिर्यादीवरुन रविवारी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, शेतकरी विनायक पवार हे शेवगा येथून दुचाकीने दैठणाकडे जात होते. सायंकाळी सात वाजता दैठणा शिवारातील शेतकरी रघुनाथ धांडे यांच्या शेतात जवळ आल्यानंतर तिघाजणांनी दुचाकीला हात दिला. गाव जवळ असल्याने कोणीतरी ओळखीचे असेल या उद्देशाने त्यांनी आपली दुचाकी थांबविली. मात्र दुचाकी थांबविताच पंचविस ते तीस वयोगटातील तिघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून जबर मारहाण केली. आणि त्यांच्या खिशातील रोख दहा हजार रुपये घेऊन पसार झाले. मारहाण झाल्याने शेतकरी पवार जाग्यावरच बेशुध्द पडले. 

टॅग्स :RobberyदरोडाCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी