शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

"मला जेलमध्ये टाकून जीवे मारायचा डाव"; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:58 IST

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील महिलांच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडले

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : सलाईनवर पडून राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं,  या मतावर मी आलो आहे. येथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल. मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या आमदारांचा बंदोबस्त करायचा आहे, अशी भूमिका घेत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी दुपारी १:३० वाजता उपोषण सोडले.

मराठा आरक्षणासाठी सूरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. या दरम्यान जरांगे पाटील यांना मध्यरात्री ३ सलाईन लावण्यात आल्या. त्यानंतर जरांगे यांनी आज पाचव्या दिवशी सकाळी उपोषण स्थगित करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानुसार दुपारी १:३० वाजता उपोषण स्थगित करून जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रवाना झाले.

रात्री शुगर ५८ झाली, म्हणून त्यांचे म्हणणे आले धोका आहे. २० ते ३० जणांनी दाबून धरत मला सलाईन लावल. इथले लोक म्हंटले आरक्षण दोन चार महिने उशिरा भेटले तरी चालत, पण आम्हाला तुम्ही पाहिजेत इथला मंडप काढू, इथला खूपच विकास रखडलेला आहे. आपले पैठण फाटा येथे कार्यालय होत आहे. काही जणांना काही  कळत नाही फक्त कुरापती करतात. भाजपच्या इथल्या नेत्याला मागे हल्ला होताना माहिती होत. माझी शक्तीच उपोषण, काही ना काही मी समाजाला आरक्षण देऊ शकलो. मराठा समाजाला मी ओबीसीमधून आरक्षण दिले, उद्या सरकारने मारले तरी माझं जीवन सार्थकी लागले. आता मी विविध भागातील रॅलीची तयारी करेल. सरकारचा जीव ज्यात आहे ती सत्तेची खुर्ची कशी धोक्यात येईल त्याच्यासाठी काम करेल. सलाईन घेऊन उपोषण करण्यात काही अर्थ नाही, सरकारची दमछाक होणार नाही. त्यामुळे मी त्या मतावर आलोय असेही जरांगे यांनी सांगीतले. तसेच मिडियातून मंत्री देसाई म्हंटले २ महिन्याचा आम्ही वेळ मागितला होता. दिला तुम्हाला १३ ऑगस्ट पर्यन्त वेळ, असेही जरांगे म्हणाले.

फडणवीस यांच्यावर आरोप, दरेकर यांना इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये टाकून आतमध्ये मारायचे ठरवले असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. मी शंभूराजा सारखं मरायला भित नाही. फडणवीस यांना बांध फोडायची सवय लागलीय. फडणवीसांनी मुंडे, महाजन घराणे संपवले. मुंडेच्या बोटाला धरून हे मोठे झाले यांनी कित्येक घराण्यांचे वाटोळं केलं. तसेच मला जरा चांगलं होऊ द्या, कोण कसं दिसतं कोणासारख दिसत हे सांगेन. ठाणे मतदार संघात वार्ड क्रमांक २५ वर कशामुळे प्रेम आहे? बँकेचं काय आहे हे मी सांगतो. मी कोणाच्या वैयक्तिक जीवनात पडत नाही. माझ्या नादी लागू नका, असा इशारा जरांगे यांनी आमदार दरेकर यांना दिला. 

मी राजकारणात जाणार नाहीछत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा खंडित नाही झाली पाहिजे, ती वंश परंपरा फडणवीस जपत आहे.ज्यांनी घोटाळे केले त्यांना क्लीन चिट मिळते. हजारो कोटी घोटाळा करणाऱ्यांचं वॉरंट कॅन्सल होत. छत्रपतींचे महानाट्य दाखवलं गुन्हा केला का, असा सवाल जरांगे यांनी केला. २९ ऑगस्टला आम्ही ठरवणार २८८ जागा पडायच्या की उमेदवार उभे करायचे. राज्यातील सर्व मराठा एकत्र येणार, त्या दिवशी ठरवू. मी राजकारणात जाणार नाही असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना