शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

पोलिसांवर रोखले पिस्तूल; खंजीर खुपसण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:28 AM

कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर पिस्तूल रोखून एका कर्मचाऱ्यावर खंजीरने वार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी दुपारी जालना शहरातील एका लॉजवर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर पिस्तूल रोखून एका कर्मचाऱ्यावर खंजीरने वार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी दुपारी जालना शहरातील एका लॉजवर घडली. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले, एक धारदार खंजीर, कार व एक दुचाकी असा ३ लाख ८८ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.जालना शहरातील बसस्थानकाजवळील त्रिवेणी लॉज येथे दोन देशी बनावटीचे पिस्तूल व इतर हत्यार असलेले सहा संशयित व्यक्ती येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोनि. गौर व त्यांच्या पथकाने लॉजवर सापळा रचला. शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कारमधून (क्र.एम.एच.१२- बी.जी.९२५७) चौघे व एकजण दुचाकीवरून (क्र.एम.एच.२१- बी.जे.५५४८) तर सहावा व्यक्ती दुसºया दुचाकीवरून (क्र.एम.एच.२१- बी.एल.४३५४) आला. त्यातील तिघे लॉजच्या बाहेर थांबले. तर तिघे आतमध्ये गेले. तिघे लॉजमधील एका रूमसमोरील व्हरंड्यात आले असता पथकाने कारवाई करीत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकाने पोलिसांवर पिस्टल रोखली. त्यावेळी पोनि. गौर यांनी स्वत:जवळील शासकीय सर्व्हिस पिस्तूल काढून त्याच्याविरूध्द रोखली. त्याचवेळी एकाने पोहेकॉ कांबळे यांच्यावर खंजिराने वार करण्याचा प्रयत्न केला. कांबळे यांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. इतरांनी लॉजच्या बाहेर पळ काढला. बाहेर थांबलेल्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. तर लॉजबाहेर थांबलेल्या तिघांपैकी दोघे कारमधून व एकजण दुचाकीवरून पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करून त्या तिघांना ताब्यात घेतले.पोलिसांनी श्रीकांत ऋषीकुमार ताडेपकर, रवी योसेफ कांबळे, सुशांत उर्फ मुन्ना राजू भुरे, विशाल जगदीश कीर्तीशाही, अमरसिंग शिवसिंग सूर्यवंशी-ठाकूर, सुजित शुभ्रमणी श्रीसुंदर (सर्व रा. जालना) या सहा जणांना ताब्यात घेतले. तसेच दोन देशी बनावटीच्या पिस्टल, एक खंजीर, कार, दुचाकी असा एकूण ३ लाख ८८ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि संदीप साबळे, सफौ रज्जाक शेख, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, पोना प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, संजय मगरे, रंजीत वैराळे, हिरामन फलटणकर, विनोद गडदे, पोकॉ सचिन चौधरी, विलास चेके, वैभव खोकले, रवी जाधव, गणेश वाघ, गुन्हे शाखा घटक-९ ठाणे शहर येथील सपोनि संदीप बागूल, पोउपनि दत्तात्रय सरक यांनी ही कारवाई केली.या प्रकरणात पोउपनि संदीप साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील सहा जणांविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील काही आरोपींतावर खंडणी, खून, जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत.एसआरपीएफमधील जवानपोलिसांनी पकडलेल्या सहा पैकी सुजित शुभ्रमणी श्रीसुंदर हा राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) शिपाई म्हणून कार्यरत आहे. तो राज्य राखीव दल-३ जालना येथे चालक म्हणून कार्यरत आहे. एसआरपीएफ मधील जवानही पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.पाच दिवसांची कोठडीपोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेतील आरोपीतांनी पिस्टल कोठून व कोणत्या कारणांनी आणल्या होत्या, यासह इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकJalna Policeजालना पोलीस