कैलास गोरंट्याल एक कोटी
गेल्यावर्षीदेखील कोरोनासाठी आपण मोठा निधी देऊ केला होता. आणि यंदाही एक कोटी रुपये जिल्हा प्रशासनास देऊ केले आहेत. त्याचे पत्र नियोजन विभागाला दिले आहे. आता यातून ऑक्सिजन प्लांटची उभारणी करणे तसेच ऑक्सिजनसंदर्भातील अन्य कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हा तर आपला हक्काचा निधी आपण देऊ केला आहे. मित्र तसेच उद्योजकांकडूनही आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी निधी जमा करत आहोत.
-------------------------
राजेश टोपेंचे मोठे योगदान
राज्याच्या आरोग्याची धुरा सांभाळत असताना आपल्या जिल्ह्याकडे आणि विशेषकरून मतदारसंघाकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विशेष लक्ष असते. त्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होत असून, त्यांचा पाठपुरावा हा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडेंकडून ते सातत्याने करत आहेत.---------------------------------------
लोणीकरही आले धावून
जिल्ह्याचे पाच वर्षे पालकमंत्री राहिलेले आ. बबनराव लोणीकर यांनीदेखील कोरोनासाठी एक कोटी रुपयांचा आमदार निधी देऊ केला आहे. त्यातून आरोग्य केंद्राचे मजबुतीकरण करणे, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर खरेदी करणे आदींसाठी हा निधी वापरावा, असे पत्र त्यांनी नियोजन विभागाला दिले आहे.
---------------------------
नारायण कुचे
बदनापूरचे आ. नारायण कुचे यांनी आमदार निधीतून अद्ययावत रुग्णवाहिका दिली असून, चालू वर्षातही एक कोटी रुपयांचा आमदार निधी कोरोनावर खर्च करण्यास परवानगी दिली आहे. एकूणच, अंबड-बदनापूर या त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भागात दौरे करून किराणाचे किट देत गरजूंना मदत केली आहे.
----------------------------
केंद्रीय मंत्री दानवे
देशाचे अन्न नागरी पुरवठामंत्री म्हणून गेल्या सात वर्षांपासून ते कार्यरत आहेत. कोरोनाकाळात महाराष्ट्राला अधिकचे अन्नधान्य देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांच्या उद्योजक मित्रांकडून मतदारसंघात भरीव अशी मदत मिळवून त्यांनी दिली आहे. त्यांचे पुत्र आ. संतोष दानवे यांनीदेखील गेल्यावेळी २५ लाख रुपये कोरोनासाठी देऊ केले होते.
-------------------------------------------------
अर्जुन खोतकर
माजी मंत्री तथा शिवसेनेचे बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनीदेखील कोरोनाकाळात शिवसेनेच्या माध्यमासह बाजार समितीकडून मोठी देणगी देऊ केली आहे. लसीकरण केंद्र सुरू करण्यासह बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.
-----------------------------------
भास्कर अंबेकर
कोरोनाकाळात गेल्या दीड वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी मजुरांना भोजन देण्यासह किराणा मालाचे किटवाटप करणे, सीएसआरमधून गरजूंना मदत मिळवून देण्यासह आताच त्यांनी ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्याकडून अद्ययावत रुग्णवाहिकेसाठी १७ लाख रुपये मंजूर करून घेतले असून, ते पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे.