शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात पादचारी महिला, चिमुकली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:54 IST

बोलेरो गाडी आणि एका पिकअपच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि चार वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : बोलेरो गाडी आणि एका पिकअपच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि चार वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.अंबडकडून बीडकडे देवदर्शनासाठी निघालेली जीप (एम.एच.२१ व्ही.८२७७) गाडीच्यासमोर धाकलगावजवळ अचानक एक बकरी रस्त्यात आडवी आली. त्या बकरीस वाचवण्याच्या प्रयत्नात जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेने शेतात मजुरीसाठी जाणाऱ्या सुकराबी बशिर पठाण (६०) या महिलेस भरधाव गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या. या मार्गावरुन विरुध्द दिेशेने येणाºया दुसºया गाडीने (एम.एच. १४ डी. एफ. ९३०७) गाडीला धडक दिल्याने ती उलटली. यातील श्रुती शंकर धानुरे ( ४ ) (रा. बोधलापुरी ता. घनसावंगी) ही चिमुकली बोलेरो गाडी खाली दबल्याने जागीच ठार झाली. या अपघातातील जखमींना परिसरातील नागरिकांची मोठी मदत झाली. या मार्गावर अपघात होण्याची सत्र थांबता थांबेना. त्यामुळे या भागातून प्रवास करताना जीव मुठीत धरून जावे लागते.या अपघातात रामभाऊ पुंड,आत्माराम मोरे, शंकर धानुरे, शिल्पा शंकर धानुरे,विजय पुंड (सर्व रा.बोधलापुरी ता.घनसावंगी) मॅक्झीमो गाडी चालक मुसा वाहेद (रा. धाकलगाव) असे सहा जण जखमी झाले.अपघात झाल्यानंतर बोलेरो चालक गाडी सोडून घटनास्थळावरुन पळून गेला. बोलेरो चालकाने बेदरकार पणे गाडी चालवल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी झाली होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू