शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

समितीकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:00 AM

पंचायत राज समितीच्या अध्यक्षांसह अन्य सदस्य आमदारांनी मंगळवारी जालना जिल्हा परिषदेत मॅरेथॉन बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पंचायत राज समितीच्या अध्यक्षांसह अन्य सदस्य आमदारांनी मंगळवारी जालना जिल्हा परिषदेत मॅरेथॉन बैठक घेतली. यात मुख्य कार्यकारी अधिका-यांसह अन्य अधिका-यांची चांगलीच कान उघाडणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकूणच रस्ते, सिंचन, शिक्षण यासह वित्त आयोगाचा निधी यावरून बैठकीत अधिका-यांना धारेवर धरण्यात आले. एवढेच नव्हे तर, विभागीय आयुक्तांशी थेट बैठकीतून संपर्क करून एका महिन्याच्या आत सर्व अहवाल समिती समोर सादर करण्याचे निर्देश पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.पंचायत राज समिती येणार म्हणून जिल्हा परिषदेला यापूर्वीच दौरा कळविलेला होता. असे असताना आवश्यक ती खबरदारी प्रशासनाने घेतली नसल्याचे वास्तव बैठकीत समोर आले आहे.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यावर सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. सदस्यांचे समाधान होईल असे उत्तर मिळत नसल्याने बैठकीत चांगली गरमा गरमी झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. अनेक महत्वाच्या विकास कामांमध्ये आवश्यक ते निकष पाळले नसल्याचे दिसून आले.तीन वर्षापूर्वीच्या लेखा परीक्षण अहवालवरही यावेळी चर्चा झाली. त्या काळात जे अधिकारी येथे कार्यरत होते त्यांचीही साक्ष घेण्यात आली.तत्कालीन अधिका-यांप्रमाणे विद्यमान कार्यरत अधिका-यांनाही सदस्यांनी अनेक मुद्यावरून कोंडीत पकडले. विशेष म्हणजे या समितीने दौरा पुढे ढकलावी म्हणून चर्चेत असलेला मुद्दा समिती सदस्यांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान समितीने शासनाच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, त्यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. आज ही बैठक जिल्हा परिषदेतील स्व. यशवंतराव सभागृहात साडेतास चालली. यावेळी समितीचे जवळपास १५ सदस्यांची उपस्थिती होती.बुधवारी ही समिती चार जणांची टीम करून आठही तालुक्यांना भेट देणार आहे.कुठल्या कामाची पाहणी होते याकडे लक्षपंचायत समिती दाखल झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची चर्चा लगेचच व्हायरल झाली. समितीचा मूड गरमा-गरम असल्याने बुधवार आणि गुरूवारपर्यंत कोणावर कारवाईची कुºहाड कोसळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ही समिती ऐन वेळी कुठल्या कामांना भेटी देणार हे ठरवत असल्याने सध्या जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या विभागप्रमुखांसह कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. गाव पातळीवर या समितीच्या दौºयाची तयारी करण्यात आली आहे.दोन ग्रामसेवक निलंबितघनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील विहीर, पाईपलाईन इ. कामांमध्ये निकष डावलून ती कामे केली. त्यातील काही कामे तर न करताच त्याची लाखो रूपयांची देयके उचलली आहेत. या मुद्यावर प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह अन्य अधिकाºयांनी याची चौकशी केली होती. मंगळवारी पंचायत राज समिती येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक एम.बी. तोटे आणि बी.एल.लहाने यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारJalna z pजालना जिल्हा परिषद