शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धामणापाठोपाठ ‘पद्मावती’लाही गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:39 IST

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाला लागलेली गळती थांबते न थांबते तोच आता पारध येथील पद्मावती धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन / पारध : भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाला लागलेली गळती थांबते न थांबते तोच आता पारध येथील पद्मावती धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे. या प्रकारामुळे धरणाच्या खालील भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. दरम्यान, शेलूद येथील ग्रामस्थांमध्ये धरण फुटण्याची भिती कायम असून, गावातील शाळा, मंदिरामध्ये अनेक ग्रामस्थ रात्र काढत आहेत.शेलूद येथील प्रकल्पाच्या सांडव्याला लागलेल्या गळतीमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण होते. विभागीय आयुक्तांनी पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धरणावर ठाण मांडून गळती रोखण्याचे काम केले. मात्र, धरण फुटण्याच्या भितीने त्रस्त झालेल्या शेलूद ग्रामस्थांनी शनिवारी भर पावसात पिंपळगाव रेणुकाई ते धावडा रस्ता दोन तास रास्तारोको आंदोलन केले. नायब तहसीलदार रमेश तांगडे यांनी कर्मचा-यांसह आंदोलनस्थळी धाव घेऊन ग्रामस्थांचे ग-हाणे ऐकूण घेतले. त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळा, गजानन महाराज मंदिर आणि सरस्वती विद्यामंदिरात ग्रामस्थांच्या राहण्याची सोय करण्यात आली. त्यामुळे शनिवारी रात्री ग्रामस्थांनी गजानन महाराज मंदिर, सरस्वती विद्यामंदिर, जिल्हा परिषद शाळेत जागा मिळेल तेथे रात्र काढली. रविवारी दिवसभर अनेकांनी शेतशिवार गाठल्याने जुन्या शेलूद गावात शुकशुकाट होता.धामणा धरणाची गळती थांबते न थांबते तोच आता पारध परिसरातील पद्मावती धरणाला देखील तडे गेल्याचे समोर आले आहे. या धरणातील हजारो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असून, धरणाखाली खालील धामणगाव, डोमरुळ, टाकळी, कुंबेफाळ आदी गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.पद्मावती धरणाची १९९२ साली निर्मिती झालेली आहे. या धारणासाठी ९० टक्के जमिनी पारध परिसरातील संपादीत केलेल्या आहेत. मात्र हे धरण विदर्भातील चिखली पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. संबंधित विभागाने धरणाकडे दुर्लक्ष करीत हात वर केले आहेत. महामंडळ आणि पाटबंधारे विभागातील वादामुळे या प्रकल्पाची डागडुजी आजवर झालेली नाही. मात्र, गळतीमुळे या भागातील शेतक-यांसह सर्वसामान्यांची झोप उडाली आहे. प्रशासनाने लक्ष देऊन या धरणाला लागलेली गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी सतत दुष्काळाचा सामना केला आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाला आहे. मात्र, गळतीमुळे साठलेले पाणी वाहून जाण्याची भिती आहे.डागडुजीसाठी अधिका-यांचे धरणावर ठाण, सांडवा परिसरात विजेची केली सोयग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये म्हणून महसूल विभागाच्या पथकासह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धामणा धरणावर ठाण मांडून आहेत.शिवाय आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस पथक तंबू ठोकून आहे. हे कर्मचारी पाळीने धरणावर पहारा देत आहेत.रात्रीच्या वेळी धरण व सांडव्याच्या परिसरात विजेची व्यवस्था करण्यात आली आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

टॅग्स :DamधरणRainपाऊसfloodपूर