जालना : बदनापूर येथे काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात मंगळवारी सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेल तसेच खाद्य तेलाच्या दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. जालना जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष दिनकर घेवंदे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून रॅलीचा प्रारंभ केला गेला. यावेळी लक्ष्मण मसलेकर, मोबीन खान, सुभाष मगरे, अन्वरभाई, प्रमोद साबळे, जावेद बागवान, पप्पू कुलकर्णी, तारेख असलम, राहूल चाबूकस्वार, अमीर इनामदार आदींची उपस्थिती होती.
शहरात पावसाची हजेरी
जालना : जालना शहर व परिसरात मंगळवारी रात्री हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे सखल भागामध्ये पाणी साचले होते. तर या पावसाचा लाभ हा खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या वाढीस होणार आहे.