रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST2021-01-22T04:28:27+5:302021-01-22T04:28:27+5:30

जिल्हा काँग्रेसतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण जालना : जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी ...

Organizing blood donation camps | रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान शिबिराचे आयोजन

जिल्हा काँग्रेसतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

जालना : जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सतकर कॉम्प्लेक्स, अंबड रोड, जुना जालना येथे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गटनेते गणेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, आदींनी केले आहे.

------------

निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

चंदनझिरा : येथील जीवनराव पारे विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात नववी वर्गातून पूजा आदमाने (प्रथम), रूपाली गायकवाड (द्वितीय), जयेश मुंढे याने तृतीय क्रमांक पटकावला, तर दहावीतून दिव्या यादव (प्रथम), शीतल लासुरे (द्वितीय), पवन कोकणे यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुभाष पारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Web Title: Organizing blood donation camps