शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:55 IST

उभ्या असलेल्या हायवावर मागून जोरात दुचाकी धडकली. या धडकेत टेंभुर्णीचा युवक जागीच ठार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/टेंभूर्णी : शहरातील जिल्हा सत्र न्यायालयासमोर उभ्या असलेल्या हायवावर मागून जोरात दुचाकी धडकली. या धडकेत टेंभुर्णीचा युवक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडला. डॉ. दीपक दादाराव मुनेमाणिक (२८, टेंभुर्णी, ता.जाफराबाद ) असे मयताचे नाव आहे. तर शैलेस आमले (२६, टेंभुर्णी), अमरदीप हनुमंते (२४, रा. नांदेड) अशी जखमींची नावे आहेत.औद्योगिक वसाहतीत असलेल्या स्टील कारखान्यातील लोहयुक्त कच मंठा रोडवरील दुसऱ्या कारखान्यात खाली करुन औद्योगिक वसाहतीकडे परत जाणारा हायवा ट्रकचे (एम.एच.२१, एक्स २५२) जिल्हा सत्र न्यायालयासमोर टायर पंक्चर झाल्याने रात्री एकच्या सुमारास उभा होता. यावेळी दीपक हा त्यांच्या दोन साथीदारांसोबत दुचाकीवर (एमएच.२६ डब्ल्यू ९९१३) मोतीबागेच्या दिशेने जात असतांना अंधारात अंदाज न आल्याने समोर उभ्या असलेल्या हायवा ट्रकवर आदळली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दीपक मुनेमाणिक यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. याबाबतरविवारी रात्री उशिरापर्यंत जबाबनोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, दीपकच्या पार्थिवावरशोकाकुल वातावरणात रविवारी दुपारी टेंभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी, आजी, काका, काकू असा मोठा परिवार आहे.आई - वडिलांचे स्वप्नराहिले अपूर्णदीपकला लहानपणापासूनच डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी बी.ए.एम.एस. चे शिक्षण पूर्ण केले होते. सध्या तो कोल्हापूर येथे एम. एस. च्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याने आपल्या गावात रूग्णसेवा करावी, अशी इच्छा त्याच्या आई-वडिलांची होती. परंतू, त्याच्या जाण्याने कुटुंबाचा एकुलता एक आधार असलेल्या दीपकच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.विवाहाचे स्वप्नही चक्काचूरदीपकचे शिक्षण पूर्ण झाले की, त्याचे लग्न करुन घरात सूनबाई आणण्याचे स्वप्न त्याचे आई-वडील रंगवित होते. अनेक ठिकाणची चांगली स्थळेही दीपकला येत होती. मुलाने डॉक्टर होऊन गरीब रुग्ण बांधवांंची सेवा करावी व आपण सून- नातवंडांची स्वप्न पाहत मस्त जगावे अशी आशा असतानाच नियतीने क्षणात होत्याचे नव्हते करून टाकले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू