शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:23 IST

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होऊन २१ दिवसांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील १ लाखावर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होऊन २१ दिवसांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील १ लाखावर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे. मात्र, जिल्ह्यातील काही शाळांनी अद्यापही विद्यार्थ्यांची, निधीची माहिती न दिल्याने ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.शाळेतील सर्व मुलींना आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश उपलब्ध करून दिले जात होते. परंतु, यावर्षी शासनाने नवीन अध्यादेश काढून समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे ठरविले आहे. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात ही रक्क्म जमा करावी लागणार आहे. यासाठी जिल्ह्याला ७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.दरम्यान, शाळा सुरु होऊन २१ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही जिल्हाभरातील १ लाख ८ हजार ७१० विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आलेला नाही. याबाबत समग्र शिक्षा अभियानाच्या विभाग प्रमुख स्नेहलता सोळुंके यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, शाळांच्या खात्यात असलेला निधी वजा करुन विद्यार्थ्यांनुसार ही रक्कम शाळांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे.त्यानुसार समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने शाळांना निधीची माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप काही शाळांची माहिती येणे बाकी आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना गणवेश देणे गरजेचे आहे.चार दिवसांत निधीजिल्हाभरात जवळपास १५०० शाळा आहे. या सर्व शाळांना निधीची माहिती देण्याचे आदेश समग्र शिक्षा अभियानाच्यावतीने देण्यात आले होते. अद्याप जवळपास १४१० शाळांनी माहिती दिली असून, ९० शाळांनी अद्यापही निधीची माहिती दिली नसल्याचे विभाग प्रमुख सोळुंके यांनी सांगितले. दरम्यान, या शाळांना सोडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून, येत्या चार दिवसांत मुख्याध्यापकांच्या खात्यात निधी जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणgovernment schemeसरकारी योजना