शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वरातीत केलेल्या गोळीबारात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:41 IST

मौजे गवळीवाडा येथे नवरदेवाच्या वरातीत गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने नवरदेवाचा मोठा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना जालना तालुक्यातील मौजे गवळीवाडी येथे बुधवारी रात्री घडली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील मौजे गवळीवाडा येथे नवरदेवाच्या वरातीत गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने नवरदेवाचा मोठा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना जालना तालुक्यातील मौजे गवळीवाडी येथे बुधवारी रात्री घडली. यामुळे लग्न वरातीत एकच खळबळ उडाली होती.निधोना येथील सागर तुकाराम शहापूरकर यांचा मांडवा येथील युवतीशी विवाह जुळला होता. २७ मार्च रोजी मांडवा येथे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गावातील मारोती मंदीरापासून नवरदेवाची वरात डीजेच्या तालावर लग्नमंडपाकडे निघाली होती. यात नवरदेवाची मित्रमंडळी, नातेवाईकांनी डीजेच्या तालावर ठेका घेतला होता. अशातच नवरदेवाचा नातेवाईक गजानन तौर याने हवेत गोळीबार केला. त्यातील एक गोळी नवरदेवाचा मोठा भाऊ किरण शहापूरकर यांच्या कमरेच्या वरच्या बाजूला लागून ते गंभीर जखमी झाल्याने वरातीमध्ये एकच धावाधाव झाली. नवरदेवाच्या नातेवाईकांनी जखमी किरण शहापूरकर यास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. गावात लग्नाच्या वरातीत गोळी लागून एक जण जखमी झाल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली याची माहिती ग्रामस्थांनी चंदनझिरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक कौठाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. पोहेकॉ अनिल काळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. यात गजानन तौर आणि गोरख पंगळूवाले यांच्यावर गुन्हा दाखल आहे.लग्नाच्या वरातीत गोळीबार करुन दोघे जण गंभीर जखमी झाल्याची जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. १० मार्च रोजी घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे मुलाच्या लग्नात माजी सैनिकाने हवेत गोळीबार केल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. माजी सैनिकाविरुध्द गोंदी पोलिसांत गुन्ह्याची नोंद आहे. सतरा दिवसानंतर जालना तालुक्यातील गवळीवाडी येथे गोळी सुटून जखमी झाल्याची दुसरी घटना आहे. यातील आरोपीचा अद्यापही शोध लागलेला नाही.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार