शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

शेतात गाय चारण्यावरून वाद पेटला; रॉड, कुऱ्हाडीने मारहाणीत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 14:46 IST

करंजळा येथील धक्कादायक घटना, सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

जालना, सुखापुरी : शेतात गाय चारण्याच्या कारणावरून एकाला लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने वार करून ठार मारल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील करंजळा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. रामा पिराजी घुले (४८, रा. करंजळा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक घुले यांच्या फिर्यादीवरून अशोक रामा सावंत, लहू रामा सावंत, रामेश्वर अशोक सावंत, दत्ता लहू सावंत, शंकर लक्ष्मण धुमक, भगवान लक्ष्मण धुमक (सर्व रा. करंजळा) या संशयितांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड तालुक्यातील करंजळा येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हातात कुऱ्हाडी, लोखंडी रॉड व काठ्या घेऊन राम घुले यांच्या घरासमोर आले. संशयित अशोक सावंत हा फिर्यादीला म्हणाला की, ‘तुझा बाप माझ्या शेतात जनावरे सोडून आमच्या शेतीचे व पिकांचे नुकसान करतो. त्याला आता आम्ही जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा रामा घुले हे समजावून सांगण्यास गेले असता, संशयित रामेश्वर सावंत याने हातातील कुऱ्हाडीने घुले यांच्यावर वार केले. त्यानंतर संशयितांनीही कुऱ्हाड, लोखंडी रॉड व काठीने रामा घुले यांना मारहाण केली. यात रामा घुले हे रात्री उशिरा मयत झाले. गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी याची माहिती गोंदी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्याचे सपोनि. सुभाष सानप हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घुले यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

सर्व आरोपी ताब्यातघटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. सर्व आरोपींना गावातूनच ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळाला अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी, सपोनि. सुभाष सानप यांच्यासह मदन गायकवाड, संदीप कुटे, नागरगोजे यांनी भेट दिली.

१५ दिवसांत चार घटनाजिल्ह्यात खुनांची मालिकाच सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत जवळपास चार घटना घडल्या आहेत. यात जालना शहरातील शंकरनगर येथे पतीने पत्नीचा खून केला. तर भोकरदन येथे पतीने अपघाताचा बनाव करून पत्नीला ठार केले. त्या अगोदर भोकरदन येथेच शेजारी राहणाऱ्या महिलेने वृद्ध महिलेचा खून केला. त्यानंतर आता करंजळा येथे एकाचा खून करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना