शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनाने घेतला वृद्धाचा बळी; ट्रकवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:20 IST

सोमवारी सकाळी झालेल्या ट्रक अपघातात कन्हैय्यालाल पुनमचंद गारे (६५ रा. काद्राबाद) या वृध्दाचा बळी गेल्याची संतप्त भावना शहरवासिय व्यक्त करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै २०१८ मध्ये आदेश काढून शहरातील ८ मार्गावरून जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी आहे. मात्र, या प्रवेशबंदी आदेशाचे ना चालक पालन करतात ना वाहतूक शाखा याकडे लक्ष देते. प्रशासकीय अनास्थेमुळे सोमवारी सकाळी झालेल्या ट्रक अपघातात कन्हैय्यालाल पुनमचंद गारे (६५ रा. काद्राबाद) या वृध्दाचा बळी गेल्याची संतप्त भावना शहरवासिय व्यक्त करीत आहेत.जालना शहरात जड वाहने येत असल्याने होणारी वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जुलै २०१८ मध्ये आदेश काढून आठ मार्गावरून जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली होती. विशेषत: सकाळी ८ ते रात्री ११ या वेळेत ही प्रवेशबंदी आहे. मात्र, सर्रास शहरात जड वाहने येत असून, या जड वाहनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोेंडी होते. जड वाहनांच्या प्रवेशबंदी आदेशा पाळला असता तर हा अपघात झाला नसता असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.परिणामी सोमवारी सकाळी सुभाष चौकाजवळ एका ट्रकने (क्र. एम.एच.२१- ९४९६) धडक दिल्याने कन्हैय्यालाल पुनमचंद गारे (६५ रा. काद्राबाद) या वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली.घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि महाजन, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत केले. या प्रकरणात मयताचा मुलगा मंगल कन्हैय्यालाल गारे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरूध्द सदरबाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, तपास पोउपनि चव्हाण हे करीत आहेत. यावेळी मराठा महासंघाचे अरविंद देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वृध्दाचा मृतदेह हलविण्यासह वातावरण शांत करण्यास मदत केली.पोलीस अधीक्षकांनीसूचना द्याव्यातशहरातील विविध मार्गावर जड वाहने फिरत आहेत. जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी जड वाहनांना निर्धारित वेळेत शहरात प्रवेशबंदी आदेशाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नादोरे, रेमेश देहेडकर यांनी वारंवार पाठपुरवा केला होता. यापूर्वीही असे अनेक बळी जड वाहतुकीने घेतले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूstone peltingदगडफेकJalna Policeजालना पोलीस