शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात विषारी द्रव प्राशन करून वृद्धाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 23:41 IST

 जालना - जाफराबाद - कुंभारी (ता.जाफराबाद) येथील साहेबराव एकनाथ मिचके (६५) यांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. मात्र, मृत व्यक्ती हा बाहेरूनच विषारी द्रव प्राशन करून ठाण्यात आला होता, असे सांगत पोलीस अधिका-यांनी या प्रकरणात हात झटकण्याचा प्रयत्न केला.याबाबत प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या ...

 

जालना - जाफराबाद - कुंभारी (ता.जाफराबाद) येथील साहेबराव एकनाथ मिचके (६५) यांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. मात्र, मृत व्यक्ती हा बाहेरूनच विषारी द्रव प्राशन करून ठाण्यात आला होता, असे सांगत पोलीस अधिका-यांनी या प्रकरणात हात झटकण्याचा प्रयत्न केला.

याबाबत प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार साहेबराव मिचके हे रात्री आठच्या सुमारास ठाण्यात आले. त्यांनी एका पोलीस कर्मचाºयाच्या नावाचा उल्लेख करीत सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णलयात दाखल केले. मात्र, उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जाफराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात अशी कुठलीही घटना घडली नाही.  जाफराबाद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अक्षय क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात आणलेल्या व्यक्तीने विषारी द्रव प्राशन केले होते, उपचारा दरम्यान, त्याचा मृत्यू झाला.  या प्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील यांच्या आदेशनुसार या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड काँस्टेबल एन. बी.भताने हे करीत आहे. दरम्यान, सालगडी म्हणून काम करणाºया मृत साहेबराव मिचके यांच्या नातेवाईक यांना घडलेल्या घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत नव्हती. 

 वरिष्ठ अधिकाºयांची टाळाटाळ

 मृत साहेबराव मिचके यांनी हे टोकाचे पाऊस का उचलले,  त्यांचा पोलीस कर्मचाºयाशी कुठल्या प्रकरणाबाबत संबंध होता, पोलिसांनी त्यांना त्रास दिला होता का, याबाबत माहिती देण्यास वरिष्ठ अधिकाºयांनी टाळाटाळ केली. हा घटनाक्रम ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

साहेबराव मिचके यांनी ठाण्यात येण्यापूर्वीच विषारी द्रव प्राशन केले होते, अशी माहिती जाफराबाद ठाण्यात वरिष्ठ अधिका-यांनी आपणाला दिली आहे. या प्रकरणी सध्या अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली असून, प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल.

- रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक, जालना.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे