शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात वृद्ध व्यापाऱ्याचे घरासमोरून अपहरण;पोलिसांनी शिताफीने केली मध्यरात्री सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 19:41 IST

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी घरासमोरून बळजबरीने उचलून अपहरण केले. 

ठळक मुद्देअपहरणकर्त्यांनी मागितली ५० लाखांची खंडणी पोलिसांनी मध्यरात्रीच केली व्यापाऱ्याची सुखरूप सुटका

जालना :  ५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथे वृध्द व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली.

जालना येथील वृद्ध व्यापारी खेराजभाई भानुशाली यांचे नवा मोंढ्यात बारदाण्याचे दुकान आहे. ते सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी जात होते.  जुन्या जालना येथील शिवशक्ती दाळमिलमधील घरासमोर स्कुटी उभी करताच, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भानुशाली यांना बळजबरीने उचलून त्यांचे अपहरण केले. 

त्यानंतर अपहरण कर्त्यांनी त्यांच्या घरी फोन करून ५० लाखाची खंडणी मागितली. याप्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलिसांना शोधण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर शहर व परिसर पिंजून काढला. पोलिसांनी दे.राजा रोडवरील वन विभागाचा परिसर पोलिसांनी घेरल्यानंतर अपहरणकर्त्यांनी भानुशाली यांना सोडून फरार झाले. मध्यरात्री १ वाजेपर्यंत पोलिसांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे भानुशाली यांची सुटका केली आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस