शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आळस झटकावा- वाघमारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:58 IST

दुष्काळ निवारणार्थ प्रभावीरीत्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी येथे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षापासून कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन दुष्काळ निवारणार्थ प्रभावीरीत्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण उपयोजनाबाबतची आढावा बैठक पालक सचिव दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी निर्देशित केले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी , आरोग्य, सिंचन, जिल्हा परिषद, निबंधक कार्यालय व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी राज्यातील विविध भागात दोन तीन वर्षांपासून कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ, पाणीटंचाईच्या समस्येचा यशस्वीरित्या सामना करण्याकरिता शासन विविध स्तरांवर सक्रिय प्रयत्न करत आहे. दुष्काळाच्या निवारणार्थ वेगवेगळ्या विभागांमार्फत प्रभावीरीत्या उपयुक्त योजनांची अंमलबजावणी करुन या परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य आहे. जालना जिल्ह्यात जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद इतर यंत्रणांच्या सोबतीने चांगले काम करत असल्याचे नमूद करुन वाघमारे यांनी दुष्काळ निवारणाच्या कामांचा वेग व व्यापकता वाढविणे येत्या काळात गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत विविध निर्देश वाघमारे यांनी यावेळी दिले.जालना जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ ५२८ गावे व १२२ वाड्यांमध्ये ६७० टँकर सुरू असून ७८५ गावांमध्ये ६९७ टँकरसाठी व टॅकर व्यतिरिक्त विहिर अधिग्रहण केलेल्या आहेत. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात टँकरच्या एक हजार ६२७ फेºया मंजूर आहेत नळ योजनांची दुरूस्तीची १९४ कामे पूर्ण झाली आहेत.जिल्ह्यामध्ये पशुधनामध्ये मोठी जनावरे तीन लाख १२७ तर ,लहान जनावरांची संख्या तीन लाख २२ हजार असे एकूण सात लाख पशुधन आहे. जिल्ह्यात मंजूर चारा छावण्याची संख्या ४८ असून ३२ चारा छावण्या सुरु झालेल्या आहेत. त्यामध्ये १८ हजारपेक्षा अधिक जनावरे आहेत. रोजगार हमी योजने अंतर्गत ८४७ कामांवर २७ हजार ७८६ मजुरांची उपस्थिती आहे.

टॅग्स :droughtदुष्काळGovernmentसरकारJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना