शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Cruise Drugs Case : मोठी बातमी! क्रूझ ड्रग्स प्रकरणात CDR काढण्यासाठी 5 लाखांची ऑफर; हॅकर मनीष भंगाळे यांचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 12:35 AM

Aryan khan drugs case : आर्यन प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी मला 5 लाखांची ऑफर होती, असे मनीष भगाळे यांचा दावा आहे. याबाबत त्यांनी आता मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून, चौकशीची मागणी केली आहे.

जळगाव : मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाशी (Cruise Drugs Case) संबंधित काही लोकांचे मोबाईल सीडीआर आणि प्रभाकर साहील नावाने डुप्लिकेट सीम कार्ड काढण्यासाठी, आपल्याला अलोक जैन आणि शैलेश चौधरी हे दोन जण जळगावात येऊन भेटले. एवढेच नाही, तर यासीठी त्यांनी आपल्याला 5 लाखांची ऑफरही दिली होती, असा खळबळजनक दावा इथिकल हॅकर मनीष भंगाळे (Manish Bhangale) यांनी बुधवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केला. तसेच, यासंदर्भात आपण मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात, दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने भंगाळे चर्चेत आला होता.भंगाळे याने नेमका काय दावा केलाय?जळगावमध्ये 6 ऑक्टोबरला भेटलेल्या अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्तींनी माझ्याकडे पूजा दलानीच्या नावाने सेव्ह असणाऱ्या नंबरचा सीडीआर काढून मागितला होता. अलोक जैन आणि शैलेश चौधरी हे दोघे मला भेटले आणि त्यांनी सीडीआर काढून मिळेल का? असे विचारत पूजा ददलानी या नावाने सेव्ह असणारा नंबर दाखवला. एक व्हाट्सएप चॅटचा बॅकअपही त्यांनी मला दाखवला. जो आर्यन खान नावाने सेव्ह होता. क्रूझ ड्रग्स प्रकरणात काहीतरी काळबेर आहे, असा माझा संशय असल्याचे भंगाळे याचे म्हणणे आहे.

5 लाखांची दिली होती ऑफर-हे काम केले तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील असे म्हणत, त्यांनी मला अॅडव्हान्स 10 हजार रुपये दिले. जाताना त्यांनी मला एक नंबर दिला, जो truecaller वर सॅम डिसुझा या नावाने दिसतोय. त्या दोघांनी प्रभाकर साईल या नावाने सीमकार्ड काढून मिळेल का? असेही विचारले, असा दावाही भंगाळे यांनी केला आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र-प्रभाकर साईल याला टीव्हीवर पाहिल्यानंतर मला या गोष्टी लक्षात आल्या, असे भंगाळे यांनी म्हटले आहे. आर्यन प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी मला 5 लाखांची ऑफर होती, असे मनीष भगाळे यांचा दावा आहे. याबाबत त्यांनी आता मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून, चौकशीची मागणी केली आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थMumbai policeमुंबई पोलीसCrime Newsगुन्हेगारी