शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
4
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
5
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
6
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
7
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
9
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
10
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
11
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
12
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
13
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
14
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
15
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
16
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
17
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
18
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
19
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
20
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार प्रकल्पातील महिलांचे कार्य उद्दिष्टपूर्ततेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:16 IST

बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यात या प्रकल्पातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही असेच चांगले काम केल्यास जिल्ह्यातून बालकामगारांचे उच्चाटन होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यात या प्रकल्पातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही असेच चांगले काम केल्यास जिल्ह्यातून बालकामगारांचे उच्चाटन होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. त्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, कामगार अधिकारी टी.ई. कराड, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, विधितज्ज्ञ अश्विनी धन्नावत, स्त्रीरोग तज्ज्ञ अंजली हुसे, दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विद्या पटवारी, जे.ई.एस. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संध्या रोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना विजया रहाटकर यांनी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून बालकामगार विद्यार्थ्यानी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, कार्यक्रमाचे नियोजन पाहून तसेच बालकामगार प्रकल्पातील महिला कर्मचाºयांचे कार्य व शिस्त बघून सांगितले की, खरोखरच हा बालकामगार प्रकल्प उद्दिष्टपूर्ततेकडे जात आहे. आज महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे, हे त्यांनी महिला संदर्भातील विविध कायदे याचे उदाहरण देऊन सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगा सोबत पुढील येणा-या काळात महत्वकांक्षी प्रकल्प व महत्वाकांक्षी उपक्रम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पासोबत राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महिला व बालकांसंदर्भात प्रस्ताव केंद्र शासनाकडून मंजूर करून त्याचा प्रत्यक्ष लाभ प्रकल्पास देण्याची ग्वाही दिली.सूत्रसंचालन मो. फरहीन तर आभार प्रदर्शन छाया सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील कार्यक्रम व्यवस्थापक रामदास जगताप, व्यवसायिक प्रशिक्षक उषा मगर, रेखा बोर्डे, रुपाली कोकणे, दुर्गा शेळके, अर्चना घाटेकर, शेख समीना, रूचिरा धोत्रे, पुष्पा कापसे, शेख अरेफा, प्रतिभा सुरडकर, दत्तात्रय रायमल, राजू राठोड, शुभांगी रत्नपारखी यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.जालन्यात २००५ पासून हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती मनोज देशमुख यांनी देऊन, यातून अनेकांना लाभ झाला आहे.यावेळी अपर जिल्हाधिकारी खपले म्हणाले की, प्रकल्पाकरिता भविष्यात प्रशासनास्तरावर आवश्यक मदत करण्याचे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकामध्ये प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी सांगितले की, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प जालना हा महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण असून, प्रकल्पात महिला कर्मचारी जास्त असल्यामुळेच त्यांच्या माध्यमातून बालकामगार विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासकीय व अशासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळून दिला आहे. यावेळी डॉ. अंजली हुसे, विधि तज्ज्ञ अश्विनी धन्नावत, विद्या पटवारी, संध्या रोटकर यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :WomenमहिलाVijaya Rahatkarविजया रहाटकरSocialसामाजिक