शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

उन्हाळ्याच्या सुटीत शाळेत तयार केली रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:39 IST

घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो.

नसीम शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : गावचा विकास हा त्या गावातील शाळेत घडणाऱ्या कोवळ्या पिढीच्या प्रगतीवर अवलंबून असतो. आजही शाळेच्या विकासाचा ध्यास घेऊन रात्रंदिवस झटणारे अनेक शिक्षक साने गुरूजींचा वसा पुढे चालवित आहेत. जाफराबाद तालुक्यातील घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो.एकीकडे अन्य शिक्षक सध्या उन्हाळी सुटीचा आनंद घेत असताना या अवलिया शिक्षकाने सुटीतील खिचडीच्या निमित्ताने शाळेच्या परिसरातील चिमुकल्यांचा गोंगाट कायम ठेवला आहे. इतकेच नाही तर खिचडीसोबत विद्यार्थ्यांना सुटीचा काहीतरी उपक्रम मिळावा म्हणून शाळेत रोपवाटिका तयार केली आहे.या रोपवाटिकेत चिंच, सीताफळ, रामफळ, गुलमोहर, कडूलिंब, हदगा इ. बिया विद्यार्थ्यांकडून गोळा करून जवळपास १५० पिशव्या मातीने भरल्या आहेत. या पिशव्यात बी पेरून त्यांना पाणी दिले जात आहे. तयार झालेल्या रोपांचे पावसाळ्यात शाळा व गाव परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. यामुळे ऐन सुटीत मोबाईल, टीव्हीत रमणारे विद्यार्थी थेट शाळेत श्रमदान करून पर्यावरणास मोठा हातभार लावत आहेत.सर्वांच्या सहकार्याने रोपवाटिकाया रोपवाटिकेसाठी झगरे गुरूजी यांना शालेय विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीसह शाळेचे स्वयंपाकी जगन खिरडकर, गावातील विकास ढाले, रवींद्र मोरे, घाणखेडा येथील कृषी सहायक नीलेश घेवंदे, केंद्रप्रमुख सलीम पठाण, मुख्याध्यापक संतोष खरे, शिक्षक चंद्रकांत तोंडे आदींचे भरीव सहकार्य लाभले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाNatureनिसर्गenvironmentवातावरण