शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरएचएम’च्या कर्मचाऱ्यांचा पगारीसाठी दिवाळीनंतर शिमगा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:47 IST

एनआरएचएम अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्यांच्या पगारीला बायोमेट्रिकमुळे चांगलीच कात्री लागली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एनआरएचएम अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्यांच्या पगारीला बायोमेट्रिकमुळे चांगलीच कात्री लागली आहे. त्यामुळे उसनवारीवर दिवाळी सण साजरा केलेले कर्मचारी हाती पडलेली पगार पाहून प्रशासनाच्या कारभाराबाबत शिमगा करीत आहेत, तर नगर पालिकेतर्गत असलेल्या ‘एएनएम’ (परिचारिका) यांनी मंगळवारी आ. कैलास गोरंट्याल यांच्याकडे धाव घेऊन पगारीबाबत आपले गºहाणे मांडले.जिल्हा रूग्णालयांतर्गत व जिल्हा परिषदेंतर्गत एनआरएचएम मध्ये जवळपास ४०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. शासनामार्फत राबविल्या जाणाºया विविध आरोग्य विषयक योजना या अधिकारी, कर्मचा-यांमार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. मात्र, जिल्हा रूग्णालयांतर्गत कार्यरत या अधिकारी, कर्मचा-यांच्या पगारी जिल्हा परिषदेकडे वर्ग झाल्या आणि ३०० वर अधिकारी, कर्मचा-यांच्या पगारी वेळेवर न होण्याचा सिलसिला सुरू झाला. कधी बायामेट्रीक तर कधी वेळेवर अहवाल न येण्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, ऐन दिवाळी सारख्या सणातही सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्याची पगार जिल्हा परिषद प्रशासनाने न केल्याने जिल्हा रूग्णालयांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. अनेकांनी उसनवारीवर दिवाळी सारखा सण साजरा केला. मात्र, दिवाळीनंतर हाती पडलेली पगार पाहून प्रशासनाच्या नावे ‘शिमगा’ करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. काही जणांच्या ८ दिवसाच्या काही जणांच्या १५ दिवसाच्या तर अनेकांच्या २० हून अधिक दिवसांची पगार कपात झाल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. तर काहींनी मोजकीच पगार हाती पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी संघटनेमार्फत वरिष्ठांकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या.पाठपुरावा सुरू आहेएनआरएचएम अंतर्गत अधिकारी, कर्मचा-यांच्या पगारी वेळेत व्हाव्यात, यासाठी आम्ही सतत निवेदने दिली आहेत.मात्र, आमच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. बायोमेट्रीकमुळे अनेकांच्या गत दोन महिन्यांच्या पगारी कपात करण्यात आल्या आहेत.आम्ही कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीनुसार पत्र संबंधितांना देऊन पगारीसाठी लोकशाही मार्गाने पाठपुरावा करणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मुंडे, सचिव मनोज जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :fundsनिधीHealthआरोग्यMLAआमदार